शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दंगली घडवणे हा तर 'मविआ' सरकारच्या नियोजनाचा भाग; पुण्यात भाजपची आंदोलनातून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:40 IST

त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत दंगली घडल्या होत्या

पुणे : त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपूर्वी अल्पसंख्याक नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध शहरांत पुकारलेल्या बंदला व काढलेल्या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

या दंगली घडवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. विरोधी पक्षनेतेही दंगलीबाबत राज्य सरकारवर टीका करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दंगली घडवणे हा तर महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनाचा भाग आहे अशी टिकाही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली आहे.

राज्यातील मालेगाव, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, कारंजा लाड या शहरांत बंदचे आवाहन करण्यात आले होते. पुण्यातही ग्रामीण भागात दंगलीमुळे जमाव बंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परंतु दंगली घडवण्यात आल्या कि नाही यावर अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पुण्यात आज सकाळी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'हिंदू के सन्मान मै भाजप है मैदान मै' अशी घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली. 

जगदीश मुळीक म्हणाले,  त्रिपुरा मध्ये जी घटना घडली नाही ती घडल्याचं भासवून नांदेड , मालेगाव अमरावती याठिकाणी दंगली घडवण्यात आल्या आहेत. जे रजा अकादमीचे दंगेखोर होते. त्यांना पाठीशी घालण्याचं काम हे महाविकस आघाडी सरकार करत आहे. या दंगेखोरांना पाठीशी घालून जे नागरिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम या सरकारने केले आहे. रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. महाविकस आघाडी सरकार दंगे थांबवण्यात अपयशी झाले. कारण हा तर या सरकारच्या नियोजनाचा एक भाग असल्याचे ते म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीjagdish mulikजगदीश मुळीकPoliceपोलिस