बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:45 IST2019-07-27T14:44:14+5:302019-07-27T14:45:23+5:30
मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान आज पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रेल्वेच्या विघ्नात वाढ झाली आहे.

बोरघाटात रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली
लोणावळा : मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान आज पुन्हा मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने रेल्वेची वाहतुक पुर्णतः विस्कळीत झाली आहे. लोणावळा खंडाळा परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने खंडाळा घाटात रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड, माती व झाडं आल्याने रेल्वे मार्गाची मिडल व डाऊन लाईन बंद झाली आहे. घाट परिसरातील धोकादायक दरडी काढण्याकरिता रेल्वेने पंधरा दिवस या मार्गावरील जवळपास वीस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच आज पुन्हा दरड कोसळल्याने रेल्वेच्या विघ्नात वाढ झाली आहे. घटनेची माहिती समजताच रेल्वेची टिम मंक्कीहिल परिसरात दाखल झाली आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्याने डोंगरावरुन सतत माती रेल्वे मार्गावर येत असल्याने वाहतुकाचा खोळंबा सुरु आहे.