शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना विचारली जातेय वैयक्तिक माहिती, केंद्रीय संस्थांची करामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 3:01 PM

केंद्रीय संस्थांकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती देण्यापूर्वी त्यांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्ताच्या पुरावा मागितला जात आहे़. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स आॅफ इंडियाकडून तसे पत्र पाठविण्यात आले आहे़ 

पुणे : माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करणार्‍या अर्जदाराची ओळख गोपनीय ठेवण्याचे बंधन असतानाही आणि कायद्यात तरतूद नसतानाही केंद्रीय संस्थांकडून माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती देण्यापूर्वी त्यांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्ताच्या पुरावा मागितला जात आहे़ माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांना सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स आॅफ इंडियाकडून तसे पत्र पाठविण्यात आले आहे़ संजय शिरोडकर यांना काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन मंडळाने (एसटी) माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेली माहिती देण्यासाठी जो खर्च येतो, त्यावर जीएसटी लावण्यात आला होता़ आता केंद्र सरकारच्या एका खात्याने पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाचा दाखला देऊन त्यांनी विचारलेली माहिती देण्याऐवजी त्यांची ओळख पटेल असे शासकीय संस्थांचे ओळखपत्र आणि घराच्या पत्त्याचा पुरावा मागितला आहे़ याविरुद्ध त्यांनी वरिष्ठ माहिती अधिकार्‍याकडे अपिल दाखल केले आहे़ याबाबत संजय शिरोडकर यांनी सांगितले, की माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ नुसार शासकीय संस्थांनी स्वत:हून माहिती जाहीर करणे आवश्यक आहे़ या कायद्यातील कलम ६ (२) नुसार अर्जदाराची संपर्कासाठी आवश्यक तेवढी नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ई मेल ही माहिती पुरेशी आहे़ संबंधित अधिकार्‍याने ज्या उच्च न्यायालयाचा निकालाचा संदर्भ देऊन वैयक्तिक माहितीची मागणी केली आहे़, तिचा कोठेही माहिती अधिकार कायद्यात उल्लेख नाही़ गेल्या १२ वर्षात आपण माहिती अधिकार कायद्याखाली जवळपास ५ हजार अर्ज केले आहेत़ आतापर्यंत कोणीही अशी माहिती मागितली नसताना आणि कायद्यात तरतूद नसताना या अधिकार्‍यांनी हा जावईशोध कसा लावला? राज्य शासनाचा असाच अनुभव आला असताना आता केंद्र सरकारच्या एका खात्याकडूनही तसाच अनुभव आला आहे़ या सरकारकडून पारदर्शक कारभाराची अपेक्षा असताना ते अशाप्रकारे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची वैयक्तिक माहिती मागितली जाते़ हे धोकादायक आहे, असे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :Puneपुणे