शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आधार कार्डसंदर्भात प्रशासनाकडून कामाचा आढावा; महाआॅनलाइनच्या २७ आॅपरेटर्सना टाकले काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 5:04 AM

आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत.

पुणे : आधार कार्डसंदर्भात उद्भवत असलेल्या अडचणी महाआॅनलाइन कंपनीमुळे येत असून, या कंपनीच्या २७ आॅपरेटर्सना काळ्या यादीत टाकण्यात आले असून, तब्बल ५४ मशीन्स नादुरुस्त झालेल्या आहेत. मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी या मशीन्स दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यात यावी तसेच खासगी कंपन्यांच्या १00 आॅपरेटर्सना शासकीय कार्यालयांमध्ये नियंत्रणाखाली काम करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.आधारकार्ड नोंदणी व दुरुस्तीच्या कामांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आधार कार्डच्या कामाचा आढावा घेतला. केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महाआॅनलाइनच्या संथ कामामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वी आधार नोंदणीचे काम केलेल्या चार कंपन्यांच्या १00 आॅपरेटर्सने शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्यास तयार असल्याने लेखी स्वरूपात दिले आहे. या आॅपरेटर्सना काम करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून, यावर सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता असल्याचे राव यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडे एकूण २७0 मशीन्स आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सद्यस्थितीत ९६ केंद्रे सुरू असून, यातील ५२ केंद्रे पुणे शहरात सुरु आहेत. तर ५४ मशीन्स नादुरुस्त आहेत. माहिती व तंत्रज्ञान विभागाने वार्षिक देखभाल करार न केल्याने मशीन्सच्या देखभाली प्रश्न निर्माण झाला आहे....तर त्यांनाही काळ्या यादीत टाकणारखासगी कंपन्यांच्या आॅपरेटर्सची नेमणूक करण्यात आल्यानंतर त्यांनी जर गैरवर्तणूक केली, भ्रष्टाचार केला, तर त्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात येणार असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.खासदार अनिल शिरोळे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेऊन अधिकाºयांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी आधार कार्डला येत असलेल्या अडचणी आणि कामाचा आढावा घेतला.जिल्ह्यातील बंद असलेल्या मशीन्स दुरुस्त करण्यास परवानगी मिळाल्यास जिल्हा नियोजन समिती अथवा सेतूमधून खर्चाची तरतूद करता येणार आहे. मावळ व खेडमधील मशीन्स कमी करून पुणे शहराला आणखी २0 मशीन्स देण्यात येणार आहेत. पुण्यात १२५ मशीन्स लागणे अपेक्षित आहे. उर्वरित ५0 मशीन्सचा तुटवडा पुढील दहा ते पंधरा दिवसांत दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड