उपमुख्यमंत्र्यांकडून मेट्रोच्या कामाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:27+5:302020-12-08T04:11:27+5:30

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून आभासी बैठक घेत पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. कामाची गती वाढवण्याची सूचना देत ...

Review of Metro work by Deputy Chief Minister | उपमुख्यमंत्र्यांकडून मेट्रोच्या कामाचा आढावा

उपमुख्यमंत्र्यांकडून मेट्रोच्या कामाचा आढावा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून आभासी बैठक घेत पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. कामाची गती वाढवण्याची सूचना देत या कामामुळे नागरिकांची किंवा वाहतूकीची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.

महामेट्रो कंपनीचे अधिकारी पुण्यातून आभासी पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. पुणे महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे मुंबईत असल्याने बैठकीत प्रत्यक्ष सहभागी झाले. पीएमआरडीकडून शिवाजीनगर ते हिंजवडी अशी मेट्रो होत आहे. यासाठी आवश्यक सर्व जागांचे संपादन झाले आहे. मेट्रोच्या खाबांसाठी खड्डे घेतले जात आहेत. कास्टिंग यार्डच्या कामालाही सुरूवात झाली असल्याची माहिती दिवसे यांनी दिली.

महामेट्रोचे संचालक (नियोजन) रामनाथ सुब्रम्हण्यम यांनी वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी चिंचवड ते दापोडी या प्राधान्य मार्गाच्या कामाची माहिती दिली. मेट्रो मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असून आता या प्राधान्य मार्गांवरील स्थानकांचे काम सुरु असल्यचे त्यांनी सांगितले.

Web Title: Review of Metro work by Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.