शिक्रापुरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:47 AM2017-11-23T11:47:20+5:302017-11-23T11:49:52+5:30

पुणे-नगर रोडवर शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाने कार्यवाही करत ट्रक शिक्रापूर येथे ताब्यात घेतले.

Revenue department action on five trucks carrying illegal sand transport in Shikrapur | शिक्रापुरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाची कारवाई

शिक्रापुरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाची कारवाई

Next

शिक्रापूर : पुणे-नगर रोडवर शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर महसूल विभागाने कार्यवाही करत ट्रक शिक्रापूर येथे ताब्यात घेतले. शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी टी. एम. गोसावी, एस. आर. नलावडे, आर. जे. वाल्मिकी, तलाठी प्रमोद लोखंडे, विजय बंडभर, प्रशांत शेटे यांनी रात्री ही कार्यवाही केली. शिक्रापूर-चाकण रस्त्यावर वाळूच्या पाचही गाड्या पकडण्यात आल्या प्रत्येक ट्रकमधील ब्रासप्रमाणे ३५ हजार ४०० प्रति ब्रासप्रमाणे दंड करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Web Title: Revenue department action on five trucks carrying illegal sand transport in Shikrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे