देवळी तालुक्यात रातोरात बदलले वाळूसाठ्याचे ब्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:14 PM2017-11-20T23:14:14+5:302017-11-20T23:15:13+5:30

देवळी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वाळूच्या लिलावात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शींनी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे.

A bridge over the sand in Devli taluka changed overnight | देवळी तालुक्यात रातोरात बदलले वाळूसाठ्याचे ब्रास

देवळी तालुक्यात रातोरात बदलले वाळूसाठ्याचे ब्रास

Next
ठळक मुद्देलिलावावर आर्थिक व्यवहाराचे सावट : प्रत्यक्षदर्शींची जिल्हाधिकाºयांना तक्रार

आॅनलाईन लोकमत
वर्धा : देवळी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेल्या वाळूच्या लिलावात गैरप्रकार झाल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शींनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. लिलावाची प्रक्रिया पार पाडताना रातोरात वाळू साठ्याची ब्रास बदलण्यात आल्याने लिलावावर आर्थिक व्यवहाराचे सावट असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. यामुळे सदर तक्रारीची जिल्हाधिकाºयांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.
अवैध वाळू साठवणुकीचे लिलाव देवळी तहसील कार्यालयाच्यावतीने २७ आॅक्टोबरला करण्यात आले. ज्या दिवशी लिलाव झाले त्या दिवशी दोनच जागेचा लिलाव झाला. परंतु, तहसील कार्यालयाच्यावतीने तीन लिलाव झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. लिलावाच्या दिवशी एकलासपूर येथील शेत सर्वे क्र. ४ मधील ३५२.०६ वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला. येथे १ हजार ते १ हजार ५०० ब्रास रेतीसाठा आहे. निमगव्हाण येथील शेत सर्वे क्रमांक न टाकता नदी घाट या नावाने ८७.०२ ब्रास वाळूचा लिलाव करण्यात आला. निमगव्हाण येथे वाळूसाठा असला तरी तेथील मुदत संपली असतानाही हा लिलाव सव्हे क्रमांक न टाकता करण्यात आला. यामुळे सदर प्रकार आर्थिक व्यवहाराची साक्ष देणारा असल्याची ओरड आहे. यामुळे झालेल्या लिलाव प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना निवेदनातून केली आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना लिलाव
आॅगस्ट महिन्यात निमगव्हाण येथील घाट मालकाविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर (रे.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच हा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना या वाळूच्या लिलावाचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
ब्रास कमी करीत गुंजखेडाच्या वाळूचा लिलाव
गुंजखेडा येथील शेत सर्वे क्रं. ३९७/२ मधील जाहीरनाम्यानुसार ६५३.९७ ब्रास वाळूसाठा हा कमी करीत ४०२ ब्रास वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला. शिवाय लिलावाच्या दिवशी कुठलीही अनामत रक्कम न भरता तसेच कोणतीही बोली न बोलता लिलाव करण्यात आला. विचारणा केली असता उडवा-उडवीचे उत्तरे दिल्या जात असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल
सदर लिलाव प्रक्रियेतील गौडबंगाल झाकण्याकरिता लिलावानंतर जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात येणारे कार्यवृत्त तब्बल देवळी तहसील कार्यालयाच्यावतीने सहा ते सात वेळा बदलविले. शिवाय जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या कार्यवृत्तात वास्तविकला लपविल्याचा आरोप आहे.
नाव नोकराचे, काम मालकाचे
वाळूसाठ्याच्या लिलाव प्रक्रियेत ज्यांच्या नावे लिलाव घेतल्याचा आदेश पारीत झाला ते या लिलावालाही उपस्थित नसल्याची माहिती आहे. ज्यांच्या नावाने आदेश पारीत होणार आहे ते इतर ठेकेदारांचे नोकर असल्याची चर्चा जोरात आहे.

तहसील कार्यालयाद्वारे झालेली वाळू लिलावाची प्रक्रिया नियमानुसार झाली आहे. शिवाय जिल्हाधिकाºयांना सादर केलेले कार्यवृत्त व्यवस्थीत आहे. कुणालाही आक्षेप असल्यास त्याने न्यायालयात यावे.
- तेजस्वीनी जाधव, तहसीलदार, देवळी.

Web Title: A bridge over the sand in Devli taluka changed overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.