शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
3
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
4
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
5
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
6
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
7
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
8
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
9
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
10
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
11
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
12
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
13
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
14
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
15
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
16
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
17
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
18
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
19
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
20
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्याच आशिर्वादाने पुन्हा सत्तेवर येऊ : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 16:00 IST

शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना राज्य रयतेचे आहे हा मुलमंत्र दिला. त्याचेच पालन केंद्र व राज्य सरकार करत आहे.

ठळक मुद्देमहायोजना शिबिराचे उद्घाटन १५ वर्ष पुण्यात ज्या योजनांची फक्त चर्चाच सुरू होती, त्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या पुणे हे उत्तम शहर आहेच, ते सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न

पुणे: केंद्रातील व राज्यातीलही सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्याच आशिवार्दाने सत्तेवर आले. त्यांनी दिलेल्या रयतेचे राज्य या मुलमंत्रानुसारच राज्यकारभार केला. आता छत्रपतींच्याच आशिवार्दाने पुन्हा सत्तेवर येऊ असा ठाम विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच मंगळवारी फुंकले.कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी महेश विद्यालय येथे आयोजित केलेल्या सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या महा-योजना शिबिराचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी झाले. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारी योजनांचा लाभ लवकर मिळत नाही असा समज होता. ज्यांच्यासाठी योजना आहेत, त्यांच्यापर्यंत त्या पोहचतच नाही अशी स्थिती होती. आम्ही त्यात बदल केला. माहिती शिबिरे, समाधान शिबिरे आयोजित केली. हे शिबिर त्यापैकीच एक आहे. शिवाजी महाराजांनी राज्यकर्त्यांना राज्य रयतेचे आहे हा मुलमंत्र दिला. त्याचेच पालन केंद्र व राज्य सरकार करत आहे. वंचित, गरीबांना लाभ देणे हे सरकारचे काम आहे. त्यादृष्टिने समाजातील सर्व थरातील घटकांसाठी विविध योजना आणल्या, फक्त आणल्यात नाहीत तर त्या संबधितांपर्यंत कशा पोहचतील याची काळजी घेतली. भौतिक विकासाकडेही सरकारचे लक्ष आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्ष पुण्यात ज्या योजनांची फक्त चर्चाच सुरू होती, त्या योजना आम्ही प्रत्यक्षात आणल्या, त्यांच्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले, काम सुरू झाले. सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर अशी योजना आहे. राज्यात सन २०२१ मध्येच ही योजना पुर्ण होईल असे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यासाठी अनेक योजना दिल्या आहेत. पुणे हे उत्तम शहर आहेच, ते सर्वोत्तम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या काही वर्षातच पुण्याचा नवा चेहरा पहायला मिळेल.मुख्यमंत्र्यांना पुढील कार्यक्रमाची घाई असल्यामुळे अन्य कोणाचेही भाषण घेण्यात आले नाही. आमदार कुलकर्णी यांनी प्रास्तविकात शिबिराची माहिती दिली. लाभार्थी घटकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेक लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची होती. मात्र ते लगेच निघून गेल्यामुळे त्यांची निराशा झाली. 

................

राज्य राखीव दलातून अपात्र म्हणून कमी केलेल्या अपर्णा धारिया यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन द्यायचे होते. त्यामुळे त्यांना पोलिसांचे कडे भेदून व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. त्यामुळे त्या भयंकर संतप्त झाल्या होत्या. अन्याय निवारण व्हावे यासाठी तक्रार करण्याचाही आम्हाला अधिकार नाही का अशी विचारणा करत त्यांनी माध्यमांसमोर गाऱ्हाणे गायले.     

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार