शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

योगशिक्षक प्रशिक्षक कार्यशाळेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 23:36 IST

पिंपरी-चिंचवड शहर भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती यांच्या वतीने महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती यांच्या वतीने महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या योगशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस पहिल्याच चांगला प्रतिसाद मिळाला.भोसरीतील भगतवस्ती येथील शिवयोगी इमारत येथे दि. १८ ते २० जूनदरम्यान ही कार्यशाळा आयोजित केली आहे. उद्घाटन महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती श्याम अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी धनिलाल यादव, प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर, दत्ता गायकवाड, अनिल पोखर्णीकर, कुंदन कारकी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत महापालिका व खासगी शाळेतील १००पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.या वेळी अगरवाल म्हणाले, ‘‘शाळांमध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, भारताची सर्वांत मोठी परंपरा असणाऱ्या योगविद्येबाबत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने अभ्यासक्रमामध्ये योगासन विषयाचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे.’’या वेळी कुंदन कारकी यांनी सर्व शिक्षकांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगदिनाच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले. (प्रतिनिधी)