टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित

By विश्वास मोरे | Updated: June 2, 2025 13:44 IST2025-06-02T13:42:38+5:302025-06-02T13:44:05+5:30

पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील औद्योगिक आरक्षणे विकास आराखड्यात बदलली : भोसरी ते बर्ड व्हॅली रस्त्यावरील 'एमआयडीसी'च्या पेठांमध्ये रहिवासी झोनचे नियोजन; शेती, ना विकास हरित पट्टे असलेल्या झोनच्या जागा झाल्या रहिवासी 

Residential zone reservation proposed on vacant land of Tata, HA industrial companies | टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित

टाटा, एचए औद्योगिक कंपन्यांच्या मोकळ्या जागांवर रहिवासी झोनचे आरक्षण प्रस्तावित

पिंपरी : मोकळ्या जागा आणि विद्यमान जागांचा वापर हे सूत्र प्रारूप विकास आराखडा तयार करण्यास वापरण्यात आले आहे. त्यामुळे औद्योगिकनगरी म्हणून विकसित झालेल्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी परिसरातील औद्योगिक आरक्षणे बदलली असल्याचे दिसून येते. पुणे-मुंबई महामार्गावर असणाऱ्या पिंपरीतील एचए कंपनीची मैदानाच्या बाजूची जागा रहिवासी झोन म्हणून नमूद केली आहे. तसेच भोसरी रस्त्यावरील टाटा मोटर्सची सुमंत सरोवराची जागा रहिवासी झोन दर्शविण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विकास आराखड्यास १९९७ त्यानंतर २००८ व २००९ मध्ये शासनाने अंतिम मान्यता दिली होती. वीस वर्षानंतर विकास आराखडा सुधारित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार २०१९ मध्ये विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यात जुनी आरक्षणे बदलण्यात आली आहेत.  

मोकळ्या जागांवर आरक्षण

जीआयएस प्रणालीद्वारे आराखडा तयार करण्यासाठी अहमदाबाद, गुजरात येथील एचसीपीची नेमणूक केली होती. त्यांनी एजन्सीने उपग्रह प्रतिमा, ड्रोन व टोटल स्टेशनच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण केले. विद्यमान जमिनींचा वापर लक्षात घेऊन आराखडा आणि नकाशा बनविण्यात आला आहे. मात्र, जुन्या आराखड्यातील आरक्षणे कमी केली आहेत. 

या ठिकाणी केले बदल

आकुर्डीतील सर्वे नंबर ५१४ जागा, खंडोबा माळ सर्वे १६२ मधील जागेत रहिवासी झोन दाखवण्यात आला आहे. भोसरी ते बर्ड व्हॅली रस्त्यावरील एमआयडीसीच्या पेठांमध्ये रहिवासी झोन दर्शवला आहे. सर्वे नंबर ८७ मध्ये ट्रक टर्मिनस आरक्षण प्रस्तावित केले आहे. रेल्वे आणि एम्पायर इस्टेटच्या मागील भागामध्ये मिश्र आरक्षण दर्शविण्यात आलेले आहे. तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील एचए कंपनीच्या समोरील जागेमध्ये रहिवासी झोन आहे.

Web Title: Residential zone reservation proposed on vacant land of Tata, HA industrial companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.