पुणे: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अखेर न्याय मिळाला. सरकारने त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करत काल जीआर काढला आहे. त्यावरून लक्ष्मण हाके यांनी आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र शासनाने जरांगे पाटील समोर हतबल होऊन हा जीआर काढला आहे. गावातल्या कुणबी सर्टिफिकेट वर आता आरक्षण मिळणार आहे. यामुळे बोगस सर्टिफिकेट वाढणार आहे. या जीआर द्वारे ओबीसीचा नरडीचा घोट घेण्यात आला आहे. आता जर तुम्ही उठला नाहीत. तर याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. असा त्यांनी ओबीसी समाजाला आवाहन केलं आहे. आज तुमचं आरक्षण संपलं आहे. एका चौथी माणसाच्या सांगण्यावरून हा जीआर चुकीचा काढला आहे. त्यामुळे तुमचे आरक्षण संपल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घडामोडीवर खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यात भाष्य केलं आहे. मानाचा पहिला कसबा गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/680240368422989/}}}}
तटकरे म्हणाले, हाके बोलतात त्याला प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज हिच राष्ट्रवादीची भूमिका काल होती आणि आज पण आहे. काल महायुती सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ओबीसी समजात काही शंका असतील त्या अभ्यास करून कळू शकणार आहेत. लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. जरुर ओबीसी संघटनेच्या ज्या भावना असतील तर त्याबाबत सरकारने त्यांना माहिती दिली पाहिजे सरकारचे ते कर्तव्य आहे. हा श्रेयवादाचा निर्णय नाही, सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते आहेत, अजितदादा आणि एकनाथ शिंदे आणि उपसमिती यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, फडणवीस हे महायुतीचे नेते आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. हेच सभागृहात आम्ही मांडले होते.