पुणे : लॉक डाऊनच्या काळात अडीअडचणीला घराबाहेर पडायचे असेल तर त्यासाठी पोलीस कारण जाणून घेऊन परवानगी देणार आहे. त्यासाठी पुणेपोलिसांच्या www.punepolice.in पुणे पोलीस डॉटइन या वेबसाईटला भेट द्या़ व आपला तपशील कळवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.नागरिकांनी आपला तपशील कळविल्यानंतर पोलिसांना कारण योग्य वाटल्यास आपला अर्ज मंजूर होईल व आपणास क्युआर कोड असलेला एक एसएमएस पाठविला जाईल. ज्या कामासाठी आपण घराबाहेर पडायचे आहे. त्याच मार्गाने जावे. वाटेत पोलिसांनी अडविल्यास त्यांना हा एसएमएस दाखवावा, अशी शहर पोलीस दलाने कळविले आहे.तात दरम्यान, पोलिसांनी आता लाठी बाजूला ठेवून कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. चौका चौकात नाकाबंदीवर असलेले पोलीस मोबाईलवर गाडीचा फोटो घेऊन त्यांच्यावर १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
अडीअडचणीच्या काळात बाहेर पडायचं आहे ? मग डिजिटल पाससाठी पाठवा माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 20:39 IST
पोलिसांनी आता लाठी बाजूला ठेवून कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे.
अडीअडचणीच्या काळात बाहेर पडायचं आहे ? मग डिजिटल पाससाठी पाठवा माहिती
ठळक मुद्देपोलीस मोबाईलवर गाडीचा फोटो घेऊन १८८ कलमाखाली करतात कारवाई