शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

४८ तासांत उत्तर द्या! खर्च कमी दाखवल्यामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 2:40 PM

दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे...

पुणे :बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक खर्चाच्या दुसऱ्या तपासणीत आढळलेल्या खर्चाच्या तफावतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी नोटीस बजावली आहे. दोन्ही उमेदवारांना येत्या दोन दिवसांत याबाबत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान या नोटिशीवर आक्षेप असल्यास उमेदवारांना जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवारांकडून आलेला खुलासा अयोग्य असल्यास प्रशासनाला देखील समितीकडे जाण्याचा अधिकार असल्याचे द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी बुधवारी (दि. १) झाली. त्यात सर्व ३८ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा २८ एप्रिलपर्यंतचा खर्च २९ लाख ९३ हजार ३१ रुपये इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात ९ लाख १० हजार ९०१ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे.

४८ तासांत उत्तर द्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा २८ एप्रिलपर्यंत एकूण खर्च ३७ लाख २३ हजार ६१० इतका झाला आहे. मात्र, उमेदवाराच्या खर्च प्रतिनिधीने सादर केलेल्या खर्चाशी निवडणूक अधिकाऱ्यांनी शॅडो रजिस्टरशी तुलना केल्यानंतर त्यात १ लाख ३ हजार ४४९ रुपयांची तफावत आढळल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. उमेदवाराने दिलेला खर्च खरा व योग्य वाटत नसल्याचे सांगत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, ही तफावत उमेदवाराच्या प्रतिनिधीने अमान्य केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिशीनुसार याबाबतचा खुलासा पुढील ४८ तासांत देण्याचे सांगण्यात आले आहे. खुलासा न आल्यास ही तफावत मान्य असल्याचे समजून ती उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

पहिल्या तपासणीत चार जणांना नोटिसा

या मतदारसंघातील उमेदवारांची पहिली खर्च तपासणी २५ एप्रिलला झाली होती. त्यात ३८ पैकी ४ उमेदवारांनी खर्च सादर केला नव्हता. त्यामुळे त्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या तपासणीपूर्वी खुलासा करण्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. दुसऱ्या खर्च तपासणीवेळी सर्व उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.

ही नोटीस मान्य नसल्यास खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्हा निवडणूक निरीक्षण समितीकडे उमेदवारांना दाद मागता येणार आहे. त्यावर या बैठकीत सुनावणी होऊन निर्णय होईल. त्यात झालेल्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.- कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी, बारामती लोकसभा मतदारसंघ

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारbaramati-pcबारामतीbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४