पुणे : वेतन रोखल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) अधिकाऱ्यांमध्ये आता दोन महिन्यांनंतर चलबिचल सुरू झाली आहे. वेतनावर सुरू असलेले काही हप्ते तसेच इतर आर्थिक बाबींवर परिणाम होवू लागल्याने काही अधिकाऱ्यांनी थेट अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांकडे धाव घेतल्याचे समजते. मात्र, अध्यक्षांनी त्याला दाद दिली नाही. आणखी काही अधिकारी यासंदर्भात अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.८० टक्के बस नियमितपणे मार्गावर धावेपर्यंत अधिकाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे. त्यानुसार पीएमपीतील ५३ अधिकाऱ्यांचे डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याचे वेतन देण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)
पीएमपी अधिका-यांचे रखडले वेतन
By admin | Updated: February 12, 2015 02:30 IST