शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

पारंपारिक गुन्हयाच्या तपासपध्दती सोडून टेक्नोसॅव्ही होणार: पुणे पोलीस प्रशासनाचा निर्धार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 11:39 IST

गुन्हयाच्या पारंपारिक तपासपध्दतीपेक्षा माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक टेक्नोसँव्ही होण्याकडे पुणे पोलिस प्रशासन लक्ष केंद्रीत करणार आहे.

ठळक मुद्देपुणे पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी वार्षिक अहवाल प्रकाशित  2018 मध्ये गुन्हेसिध्दतेचे प्रमाण  39.35 टक्के गुन्हा सिध्दतेच्या प्रमाणात गतवषीर्पेक्षा ९ टक्क्यांनी वाढ गुन्हेगारीतील काही मुद्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यात कौटूंबिक समस्या मोठ्या प्रमाणात प्रॉसिक्युशन आणि इव्हिस्टीगेशन अशा दोन टीमची निर्मितीपुढील काळात शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यावर भर

पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यावर भर असून नागरिकांना केवळ आकडेवारीच्या माध्यमातून दिलासा न देता आता पारंपारिक गुन्हयाच्या तपासपध्दतीपेक्षा माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक टेक्नोसँव्ही होण्याकडे पुणेपोलिस प्रशासन लक्ष केंद्रीत करणार आहे. २०१७ च्या तुलनेत  १८ च्या कन्व्हीकशन रेट (गुन्हासिध्दतेच्या प्रमाणात) ९ टक्क्यांनी वाढ  झाली आहे.  त्याची एकूण टक्केवारी ३९.३५ इतकी आहे. यापुढील काळात शहरात शांतता व सुरक्षिततेबरोबरच गुन्हेगारी कमी करण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून दोन टीमची निर्मिती करण्यात आली आहे.  पोलिसांबरोबरच नागरिकांच्या सहभागाने गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  शुक्रवारी पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुण्यातील वार्षिक गुन्हेगारीचा अहवाल सादर केला. यावेळी सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित होते. अहवाल प्रसिध्द करताना शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण, गुन्हेसिध्दता आणि भविष्यकाळात प्रशासनाकडून उचलण्यात येणा-या पावलांविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,  प्रॉसिक्युशन आणि इव्हिस्टीगेशन अशा दोन टीमची निर्मिती केली आहे. गुन्हेगारीतील काही मुद्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यात कौटूंबिक समस्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्याकरिता महिला सहाय्यक क्षेत्राचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक करणार आहे. अधिका-यांचे मनोबल, त्यांचा दृष्टीकोन व त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होण्याकरिता विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. पुढील काळात शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यावर भर असेल. नागरिकांना केवळ सांख्यिकीय दृष्ट्या गुन्हेगारी कमी झाली असे सांगण्यापेक्षा त्यांचा पोलीस प्रशासनात भावनात्मकदृष्या सहभाग कशा पध्दतीने वाढेल याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.  पुणे पोलिसांनी मागील दोन वर्षात २७३गुडांवर तडीपारीची कारवाई केली होती. यातील तब्बल 200 गुन्हेगार पुन्हा शहराच्या हद्दीत आढळले. यामुळे तडीपारीच्या कारवाईनंतर संबंधीत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास पोलीस कमी पडत असल्याचे दिसत आहे. काही तडीगार गुडांनी तडीपारीच्या आदेशाचा भंग करत गुन्हे ही केले आहे.    - वर्ष आणि गुन्हेशाबितीचे (गुन्हेसिध्दता व गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण) 2012  (19.23 %), 2013 (13.33 %), 2014 (9.88 %), 2015 (15.89%), 2016 (36.31%), 2017 (29.76%), 2018 (39.35)

* पुणे पोलीस प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या 2018 च्या वार्षिक अहवालातील महत्वाचे मुद्दे - खुन, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, हयगयीने मृत्यु आणि नवविवाहीत अशा भाग 1 ते भाग 5 पर्यंत मध्ये मागील वर्षभरात केलेल्या तपासअंती समोर आलेले नित्क र्ष म्हणजे या गुन्हयांमधील  कन्व्हीक्शन रेट 2018 मध्ये  66.75 टक्के इतका आहे.  याच वर्षी खुनाचे 72  गुन्हे दाखल झाले असून त्यातील 71 गुन्हे उघड झाले आहेत. मागील दहा वर्षे खुनाप्रकरणातील दोषींना शिक्षेचे प्रमाण 94 टक्के होते. 2018 मध्ये त्याची टक्केवारी 99 टक्के इतकी आहे. चोरीच्या प्रकरणातील गुन्हा उघडकीचे प्रमाण देखील 82 टक्के इतके आहे. एकूण मालमत्तेचे 4524 गुन्हे दाखल करण्यात आले यापैकी  1769 उघड झाले. 

- सायबर गुन्ह्यात देखील पोलिसांनी एकूण 175 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 100 आरोपी पकडण्यात आले. तर प्रशासनाकडे 11 लाख 51 हजार 600 रुपयांची रक्कम जमा झाली. तर 240 बिटकॉईन, 91 इथेरियम जमा झाले. 2017 मध्ये सायबरचे गुन्हयात 214 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी 90 आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हयांमधून जमा करण्यात आलेली रक्कम 6 कोटी 79 लाख  16 हजार 476 एवढी होती. 

- शहरात मागील दोन वर्षात व्हीआयपी व्यक्तींच्या दौ-यात मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. 2017 मध्ये  1086 तर 2018 मध्ये 1715 व्हीआयपी दौ-यांची नोंद करण्यात आली आहे. 2014 (445), 2015 (605), 2016 (648) याप्रमाणे व्हीआयपी दौरे पार पडले. शहरात वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून 101 गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातून 342 आरोपींना अटक करण्यात आले असून त्यातून 74 लाख 94 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर 2017 मध्ये उघडकीस आलेले गुन्हे 109, अटक आरोपी 149 तर 21 लाख 7 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

* 2018 मधील  शहरातील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी ; कंसात उघडकीस आलेली गुन्हयाची संख्या  खुन 72(71), खुनाचा प्रयत्न 128(128), सदोष मनुष्यवध 5(5), हयगयीने मृत्यु 267(215), नवविवाहिता 19(19),दरोडा 27(26), दरोड्याची तयारी 17(17), जबरी चोरी 336(227), चेन चोरी 105(76), इतर जबरी चोरी 231(201), दिवसा घरफोडी 136(61),रात्री घरफोडी 464(211), सर्व प्रकारची चोरी(3544(1177),सायकल चोरी 47(15),वाहनचोरी1966(576),वाहन पार्ट चोरी9(3),पॉकेट चोरी 16(6), विश्वासघात 81(71),फसवणूक 695(580),दंगा 232(228),दुखापत 947(935),बलात्कार 236(235),विनयभंग 516(509),अमली पदार्थ 76(76),जुगार 317(317) 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी