शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Remdesivir Shortage : आमदारांचा ओढा रेमडेसिविरकडे ; आमदार निधीतून इंजेक्शन्स खरेदीसाठी पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:03 IST

मावळ आणि भोसरीच्या आमदारांचे ऑक्सिजन प्लँट उभारणीची मागणी

पुणे : राज्यातील सर्व आमदारांनी आपला एक कोटींचा निधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर खर्च करण्यास परवानगी दिली आहे. यामुळेच पुणे जिल्ह्यातील बहुतेक आमदारांनी तब्बल पंधरा ते तीस लाखांपर्यंतची रक्कम रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करण्याची शिफारस जिल्हा नियोजन विभागाला दिले आहे. तर मावळचे आमदार सुनील शेळके आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स सोबतच ऑक्सिजन प्लँट उभारण्याची मागणी केली असून, हे दोन्ही प्रस्ताव विशेषबाब म्हणून परवानगी मिळावी म्हणून शासनाला पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात कोविड विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने शासनाने जिल्हा नियोजनचा ३० टक्के निधी कोविडवर खर्च करणे निश्चित केले. याचबरोबर सर्व आमदारांनी आपल्या विकास निधीतील प्रत्येकी एक कोटी रुपये देखील कोविडसाठी खर्च करण्यास परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यात २२ आमदार असून, यातील बहुतेक प्रामुख्याने ग्रामीण भागातील आमदारांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी खरण्याचे प्रस्ताव दिले आहेत. सध्या शहर आणि ग्रामीण भागात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी सर्वसामान्य रुग्णांची पिळवणूक होत आहे.

अनेक खाजगी हाॅस्पिटलकडून तेराशे-चौदाशे रुपयांच्या इंजेक्शन्ससाठी अव्वाच्या सवा पैसे वसूल करत आहेत. यामुळेच सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना सरकारी रुग्णालयात मोफत रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदारांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करण्याचा आग्रह धरला आहे. सध्या रेमडेसिविर इंजेक्शन्सची खुल्या बाजारातील विक्री पूर्णपणे थांबविण्यात आली असून, जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली थेट हाॅस्पिटल्सला रेमडेसिविर इंजेक्शन्स पुरवठा करण्यात येत आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सची वाढती मागणी लक्षात घेऊन बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदीची तयारी दर्शविली आहे. परंतु बाजारातच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा असून, आमदारांनी केलेली मागणी कागदावर राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. -----आमदारांचा निधी फक्त सरकारी रुग्णालयांसाठीच आमदार निधीमधून खरेदी करण्यात येणारी रेमडेसिविर इंजेक्शन्स फक्त त्यांच्या मतदार संघातील सरकारी किंवा जिल्हा रुग्णालयांनाच दिली जाणार आहेत. जिल्हा नियोजन विभागाने काही आमदारांच्या शिफारशी वरून खरेदीचे आदेश देखील दिले आहेत. परंतु रेमडेसिविर उत्पादक कंपन्यांकडून साठा नसल्याने पुरवठा होत नाही. इंजेक्शनचा पुरवठा कधी केला जाईल याबद्दल देखील शास्वती उत्पादक कंपन्यांकडून दिली जात नसल्याने सध्या तरी अडचण अशी स्थिती आहे.-------गोरगरीब रुग्णांना मोफत रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध व्हावीत यासाठीच प्रस्ताव 

आज रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी गरीब व सर्वसामान्य रुग्णांचे हाल सुरू आहेत. कोविड रुग्णांना रेमडेसिविर हा एकमेव आधार वाटत असताना मतदार संघातील गोरगरीब रुग्णांना ही रेमडेसिविर इंजेक्शन्स मोफत उपलब्ध व्हावीत याच प्रमुख उद्देशांने मी माझ्या विकास निधीतील 30 लाख रुपये रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदीचे पत्र नियोजन विभागाला दिले आहे.याशिवाय भविष्यातील गरज लक्षात घेऊन ऑक्सिजन प्लॅन्ट देखील उभारण्यासाठी पत्र जिल्हा नियोजन विभागाला दिले आहे.- सुनील शेळके, मावळ आमदार

टॅग्स :PuneपुणेMLAआमदारfundsनिधीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस