शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने भात उत्पादकांना दिलासा

By admin | Updated: September 23, 2015 03:36 IST

राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून,

पुणे : राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, नीचांकी पेरणीचे संकट सध्याच्या पावसामुळे टळले आहे. राज्यात खरिपाच्या हंगामात १ कोटी ४३ लाख ५६ हजार २०० हेक्टरवर पिके घेतली जातात. आजवर १ कोटी ३२ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात तृणधान्ये ७७ टक्के, कडधान्ये ८१ व तेलबिया १२१ टक्के असे प्रमाण आहे. कापसाचे ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, कापसाची लागवड ११४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. उसाची १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी भाताच्या आॅगस्टपर्यंत केवळ ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या होत्या. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कडधान्ये व तेलबियांच्या पेरण्या वाढल्या. भातासह ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा तृणधान्यांत समावेश असून ज्वारी ३९, बाजरी ५६ तर नाचणी ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मका १२८ टक्के, अन्य तृणधान्ये ७९ टक्के असे पेरण्यांचे ताजे चित्र आहे. खरीप तेलबियांचे ३३ लाख ९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. तेलबियांपैकी भुईमुगाची पेरणी ६४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. तीळ ३१ टक्के, कारळ ३५ टक्के, सूर्यफू ल १३ टक्के असे प्रमाण असून, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देणाऱ्या सोयाबीनची तब्बल १३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असताना ३७ लाख ७३ हजार ९०० वर पेरणी झाली आहे. खरीप तेलबियांचे एकूण पेरणी क्षेत्र त्यामुळे १२१ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पावसाने दोनदा मारलेल्या दडीमुळे यंदा खरिपाचे उत्पादन कमी येण्याची भीती व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)