शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

वाहन निरीक्षक पदासाठी 'लायसन्स अनिवार्य' हा नियम शिथिल करा; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 18:42 IST

मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी येतीये अडचण; शिकाऊ परवाना ग्राहय धरावा

ठळक मुद्देपूर्व परीक्षा पात्र ठरल्याने केवळ वाहन परवाना नसल्याने संधी हिरावू नये

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सहायक मोटार वाहन निरीक्षक गट क  २०२० परीक्षा घेण्यात आली. या पदासाठी कायमी स्वरूपातील वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक असल्याचा नियम आहे. आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी या नियमाची पूर्तता आवश्यक आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे कायम स्वरूपी वाहन परवाना नाही. त्यामुळे त्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी या नियमात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याकडे केली आहे.

या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी कायमस्वरूपी वाहन चालविण्यासाठी वैध अनुज्ञाप्ती (गिअर्स असलेली मोटार सायकल  व हलके मोटार वाहन) मागितली आहे. मात्र अनेकांकडे परवाना नसल्याने त्यांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळपास सर्वच वाहन प्रशिक्षण केंद्र बंद होती. तसेच अजूनही काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परवाना काढता आला नाही. त्यामुळे या बाबींचा विचार करून केवळ परवान्यामुळे संधी हिसकून घेऊ नये. तसेच मुख्य परीक्षा दिल्यानंतर हा नियम लागू करण्यात यावा. अशी विनंती देखील विद्यार्थ्यांनी केली आहे.

या पदासाठी १७ जानेवारी २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पूर्व परीक्षा १५ मार्च २०२० मध्ये रोजी घेण्यात आली. त्यांनतर तब्बल दिड वर्षांनी म्हणजे २४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. आता कागदपत्रे ६ ते २० सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन कागदपत्रे सादर करून मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. मुख्या परीक्षा ३० ऑक्टोबर ला घेण्याचे घोषित करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेतून २४० पदांसाठी ४४४४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.    उपस्थित केलेले मुद्दे 

-एमपीएससी कडून ही परीक्षा तब्ब्ल चार वर्षांनी घेण्यात येत आहे

-कोविड १९ मुळे वाहन परवाना काढण्यास अडथळा

-पूर्व परीक्षा पात्र ठरल्याने केवळ वाहन परवाना नसल्याने संधी हिरावू नये

-मुख्य परीक्षेनंतर हा नियम ठेवण्यात यावा

-शिकाऊ परवाना ग्राहय धरावा

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरे