शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनातून पुन्हा सोबतीचा करार, ९ हजार ४२९ दाव्यांत तडजोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 12:28 IST

बदलेल्या गरजा आणि समजून घेण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे...

ठळक मुद्दे कौटुंबिक कलह मिटण्यास ठरतेय फायदेशीरसमुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दुर होण्यास मदतइगो प्रोब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणा-या प्रकरणांची संख्या वाढली

पुणे : कौटुंबिक कलह मिटविण्यासाठी घरातील ज्येष्ठांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र त्यांच्याही प्रतयत्नातून कुटुंबियांमध्ये मनोमिलन न झालेल्या प्रकरणात समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशनाच्या माध्यमातून मध्यम मार्ग काढत ६ वर्षात तब्बल ९ हजार ४२९ दाव्यात तडजोड केली आहे.    बदलेल्या गरजा आणि समजून घेण्याची प्रवृत्ती कमी झाल्याने कुटुंबात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणांवरून देखील सख्ये भाऊ पक्के वैरी झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. तर पती-पत्नीचे अगदी किरकोळ वाद थेट न्यायालयात पोहोचतात. चांगला स्वयंपाक केली नाही, घरगुती कार्यक्रमात साडी घातली नाही अशा अनेक कारणांवरून झालेले मतभेत थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतो. तसेच आई-मुले, भाऊ-भाऊ यांच्यातील वादही न्यायालयात पोहोचू लागले आहेत. या सर्व प्रकारांमुळे न्यायालयात दाखल होणा-या खटल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा खटल्यात समुपदेशन महत्त्वाचे ठरत आहे. समुपदेशनामुळे छोटे-छोटे गैरसमज दुर होण्यास मदत होत आहे. समुपदेशनामुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचत असून, प्रकरणे लवकर निकाली निघण्यात मदत होत आहे. विधी सेवा प्राधिकरणाने समुपदेशानाद्वारे केलेल्या तडजोडीमुळे वादी आणि प्रतिवादी दोन्हीही पक्षकार आनंदी होतात.  भावांमधील वाद मिटले वडोलापार्जीत जमिनीवरून भावांमध्ये वाद होतात. त्यातील काही भाऊ तर अगदी १० ते १४ वर्षे संवादच होत नाही. निकाली काढलेल्या दाव्यांमध्ये अशा प्रकारचे खटले देखील मोठे आहेत. त्यांचे हे अनेक वर्षांचे वाद समुपदेशनातून मिटले आहेत. आयटी क्षेत्राच्या वाढीबरोबर तेथील कलह आणि इगो प्रोब्लेममुळे न्यायालयात किरकोळ कारणावरून दाखल होणा-या प्रकरणांची संख्या वाढली आहे. 

 

वर्ष          दाखल झालेली प्रकरणे   निकाली प्रकरणे २०१३           ४५३५                     २७२०  २०१४           २०२८                     १६४१ २०१५           १४५२                       ६६४ २०१६          ३७०५                      १४६९ २०१७        ५९७९                        १९३५२०१८         ३०८३                         १००० एकुण         २०,८१२                       ९४२९

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस