मिळकतकरावरील ११ टक्के वाढ फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:29+5:302021-02-05T05:19:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिका आयुक्तांनी नुकत्याच मांडलेल्या अंदाजपत्रकात मिळकतकरामध्ये तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आलेली होती. स्थायी ...

मिळकतकरावरील ११ टक्के वाढ फेटाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पालिका आयुक्तांनी नुकत्याच मांडलेल्या अंदाजपत्रकात मिळकतकरामध्ये तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आलेली होती. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये ही करवाढ फेटाळण्यात आली.
पालिकेमध्ये सध्या वार्षिक अंदाजपत्रकाचीच गडबड सुरु आहे. नगरसेवकांकडून आपल्याला अधिकाधिक निधी मिळावा याकरिता प्रयत्न केले जात आहेत. पालिका आयुक्तांनी २०२१-२२ या आर्थिक वषार्साठीचे अंदाजपत्रक नुकतेच सादर केले. तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक सादर करतानाच आयुक्त विकम कुमार यांनी मिळकतकरात ११ टक्के वाढ प्रस्तावित केली होती.
कोरोनाकाळात पालिकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात तीन ते साडेतीन हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न वाढविणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कोरोनाकाळातही मिळकतकर विभागाने चांगले काम केले आहे. अभय योजनेचा फायदा झाला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीचा भार याच विभागावर टाकण्यात आला आहे. आयुक्तांनी मिळकतकरात ११ टक्के वाढ सुचविली होती. परंतु, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही वाढ फेटाळण्यात आली आहे.
---==---
मिळकतकरातील ११ टक्के वाढीला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर प्रमुख संजय मोरे यांनी यापूर्वीच विरोध केला होता. ही करवाढ फेटाळण्यात आल्याने पुणेकरांना दिलासा मिळणार असला तरी आयुक्तांच्या अंदाजपत्रकातील १३० कोटींची उत्पन्नवाढ कमी होणार आहे.