शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भेटण्यास नकार दिला म्हणून विवाहितेचा नग्न फोटो ठेवला व्हॉट्सअप स्टेटसला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 20:17 IST

आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल...

बारामती : भेटण्यास नकार देणाऱ्या विवाहितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीने या विवाहितेशी सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित करताना व्हिडीओ आणि फोटो काढले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात राहणाऱ्या विवाहित महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्ष्मण मच्छिंद्र वीर (रा. रांजनगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद)या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

आरोपीची बहीण 26 वर्षीय फिर्यादी महिलेच्या शेजारी राहत होती. तो बहिणीकडे सप्टेंबर २०२१ मध्ये आला असताना  दोघांची ओळख झाली. तिचा पती कामाला गेल्यावर आरोपी तिच्या घरी बसण्यासाठी येत होता. यातून त्याने तिच्याशी गोड बोलून शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर या दोघांच्यात वारंवार विवाहितेच्या राहत्या घरी, लाॅजवर शरीरसंबंध येऊ लागले. त्याने त्यावेळी व्हिडीओ व फोटो काढले. फेब्रुवारी २०२२ मध्ये तो त्याच्या गावी निघून गेला. त्यानंतर २५ एप्रिल २०२२ रोजी त्याने फोन करत फिर्य़ादीला लाॅजवर भेटायला बोलावले. तिला त्याच्याशी संबंध ठेवायचे नसल्याने तिने भेटण्यास  नकार दिला.

त्याच दिवशी आरोपीने तिला दोघांचे नग्न फोटो पाठवले. तसेच तू जर मला न भेटल्यास फोटो तुझ्या पतीला व भावाला पाठविण्याची धमकी दिली. फिर्यादीने ही बाब तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर काही वेळातच त्याने तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ तिला पाठवला. तरीही फिर्यादीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर दि. २७ मे रोजी त्याने स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसला दोघांचे विवस्त्र अवस्थेतील फोटो ठेवले. फिर्यादीने त्याचा स्क्रीनशाॅट काढत पोलिसांत फिर्याद दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप