PMPML मध्ये भरतीची अफवाच; ‘पीएमपी’ भरतीत फसू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:44 IST2023-10-11T10:43:14+5:302023-10-11T10:44:17+5:30
पीएमपीएमएलने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या निगडी येथील आगारात शनिवारी दुपारी एक तरुण नेमणूक आदेश घेऊन रुजू होण्याबाबत आला...

PMPML मध्ये भरतीची अफवाच; ‘पीएमपी’ भरतीत फसू नका
पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) भरतीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक झाली होती. त्या अनुषंगाने पीएमपीएमएलमध्ये कर्मचारी पदाची कोणतीही भरती होत नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पीएमपीएमएलने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पीएमपीएमएलच्या निगडी येथील आगारात शनिवारी दुपारी एक तरुण नेमणूक आदेश घेऊन रुजू होण्याबाबत आला. त्यानंतर निगडी कार्यालयातील संबंधित कर्मचारी यांनी चौकशी केली असता महामंडळाकडून कोणतीही भरती झाली नसल्याचे व संबंधित नेमणूक आदेश बनावट असल्याचे व त्या तरुणाची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर निगडी आगाराचे आगार व्यवस्थापक यांनी शनिवारी निगडी पोलिस स्टेशन येथे बनावट आदेश देणाऱ्या विरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रार दाखल केली आहे.