ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक
By Admin | Updated: November 10, 2014 23:05 IST2014-11-10T23:05:34+5:302014-11-10T23:05:34+5:30
भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील.

ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना आवश्यक
पुणो : भविष्यात देशाची ऊर्जेची मागणी कितीतरी पटींनी वाढणार आहे. त्यामुळे सध्या वापरत असलेले जैवइंधनाचे साठे संपतील. भविष्याची ऊर्जेची गरज भागविण्यासाठी अणुऊर्जा आणि सौरऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी जैवइंधनाऐवजी अणुऊर्जा व सौरऊर्जेवर असणो आवश्यक आहे. यासाठी ऊर्जा कार्यक्रमाची पुनर्रचना करणो आवश्यक आहे, असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
बडोदे मित्रमंडळाने आयोजित केलेल्या गंगुताई पटवर्धन स्मृतिव्याख्यानमालेत ‘भारताची दूरगामी ऊर्जा सुरक्षितता’ या विषयावर काकोडकर बोलत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत अभ्यंकर, उपाध्यक्ष सुनीता साठे, विश्वस्त राजेंद्र माहुलकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अणुऊर्जा व सौरऊर्जेच्या वापरातून आपण हायड्रोजन, वीज, हायड्रोकार्बन इंधन, बायोमास यांचीही निर्मिती करू शकतो.
ते करण्यासाठी आणि वापर वाढविण्यासाठी ऊर्जा कार्यक्रमात बदल आवश्यक आहे, असे सांगत डॉ. काकोडकर म्हणाले, की सध्या आपण वापरणा:या एकूण ऊर्जेपैकी एक तृतीयांश ऊर्जा इतर देशांकडून आयात करतो. पुढील 2क् वर्षात हे प्रमाण खूप वाढून सुमारे 6क् टक्के ऊर्जा आपण इतर देशांकडून आयात करू. सध्या आपण जैवइंधनावर ऊर्जा निर्मितीसाठी अवलंबून आहोत. सन 2क्3क् र्पयत तेलावर आपल्याला 2 हजार बिलियन रुपये, कोळशावर 7 हजार बिलियन रुपये खर्च करावे लागतील. हे आपल्याला परवडणारे नाही. जगात एकूणच ऊर्जेच्या संसाधनाचा तुटवडा भासू लागेल. यावर भारताला पर्याय अणुऊर्जा आणि सौरऊर्जेचाच आहे.
सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी खूप जागा लागेल. मात्र, आपल्याकडील लोकसंख्येची घनता पाहता ते जास्त प्रमाणात शक्य होणार नाही. त्यामुळे अणुऊर्जेचा वापर वाढवावा लागेल. आपल्या विकासासाठी अणुऊर्जा ही
अपरिहार्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)