शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ पावती यवत पोलीस ठाण्याचीच

By admin | Updated: February 27, 2015 23:45 IST

बेकायदा प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी संबंधित वाहनचालकावर यवत पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून पावती दिली; मात्र त्यावरील शिक्का मंचर

यवत : बेकायदा प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी संबंधित वाहनचालकावर यवत पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून पावती दिली; मात्र त्यावरील शिक्का मंचर पोलीस ठाण्याचा असल्याने खळबळ उडाली आहे. ती पावती यवत पोलीस ठाण्याची असून या प्रकरणी चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.भांडगाव (ता. दौंड) येथील वाहनचालक महंमद जब्बार शेख यांना ती पावती देण्यात आली आहे. शेख यांनी त्यांची गाडी भरत असताना दुसऱ्या वाहनाच्या चालकाबरोबर भांडण झाले. याची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती. शेख यांच्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करीत असेल, याबाबत दंडात्मक कारवाई केली. त्यांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला होता.परंतु यवत पोलिसांनी दिलेल्या पावतीवर मंचर पोलीस ठाण्याचा शिक्का असल्याची बाब शेख यांच्या लक्षात आली. याची कुणकुण सर्व प्रवासी वाहनचालकांनादेखील लागली होती. यामुळे यात नेमकी चूक कोणाची की पावती बोगस आहे? याबाबत पोलीस ठाण्यामध्ये खळबळ सुरू होती. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी पावतीच्या अनुक्रमांकावरून या पावतीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी आज या घटनेबाबत पत्रकारांना माहिती देत असताना ती पावती यवत पोलीस ठाण्याचीच असल्याचे मान्य केले; तर पोलिसांकडे असलेल्या पावतीवर असा शिक्का नाही; मात्र वाहनचालकाच्या पावतीवर मंचर पोलिस ठाण्याचा शिक्का आलाच कसा, याची चौकशी आम्ही सुरू केली असून दोषी व्यक्तीवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. (वार्ताहर)