शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अभयारण्यातच 'या'मुळे पक्ष्यांच्या आरोग्याला होतोय धोका निर्माण; पुणे महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 12:10 IST

पक्षी सप्ताह विशेष : गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्त्यावर मुठा नदीकाठी बंडगार्डन परिसरात डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे.

ठळक मुद्देअभयारण्य संरक्षित व्हावे ;नागरिकांनी दबाव गट करावा

पुणे : ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ आणि भारताचे बर्ड मॅन डॉ. सालिम अली यांनी पुण्याला भेट दिली तेव्हा ते आताच्या डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात गेले होते. त्यांनीच इथे अभयारण्य करण्याचे सूचवले होते. तसे पक्षीप्रेमींनी त्या जागेला त्यांचे नाव दिले. पण सरकार दरबारी मात्र या अभयारण्याला अजून मान्यता मिळालेली नाही. या पक्षी सप्ताहानिमित्त तरी महापालिकेने त्याचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्त्यावर मुठा नदीकाठी बंडगार्डन परिसरात डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्या ठिकाणी दरवर्षी परदेशातून अनेक पक्षी स्थलांतरीत होऊन येतात. येथे पक्ष्यांच्या सुमारे ११० प्रजाती दिसून येतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ प्रकाश गोळे यांनी इतर पक्षीप्रेमींसोबत अभयारण्याची मुहूर्तमेढ रोवली होती.

या ठिकाणी मात्र नागरिक आणि महापालिका यांचे दुर्लक्ष होत आहे. अभयारण्याच्या परिसरात काही अज्ञात कचरा आणून टाकत आहेत. तसेच तो जाळत आहेत. त्याचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. कारण पक्ष्यांसाठी तो धूर धोकादायक ठरतो. त्यांना त्यापासून आजार होण्याचा धोका आहे. या विषयी पक्षीप्रेमींनी तक्रार दिलेली आहे, पण त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.

अभयारण्य संरक्षित व्हावे ;नागरिकांनी दबाव गट करावापुणे शहरातील पक्ष्यांचे हे एक वैभवशाली पक्षी निरीक्षण केंद्र आहे. हे ठिकाणी किमान संरक्षित करण्याची सूचना महापालिकेला केली होती. पण त्यावरही काही झालेले नाही. नागरिकांनीच आता यासाठी दबाव गट तयार केला पाहिजे. 

.................

पक्षी अभयारण्याला महापालिकेने मान्यता द्यावी, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. खरंतर पुण्यातील लहान-थोरांसाठी पक्षी निरीक्षण करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.- धर्मराज पाटील, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणHealthआरोग्य