वास्तववादी अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:43+5:302021-02-05T05:19:43+5:30
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती --------- आयुक्तांच्या बजेटचा विकासाला फायदा आयुक्तांनी मांडलेले अंदाजपत्रक वास्तववादी असून विकासाला चालना देणारे ...

वास्तववादी अंदाजपत्रक
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती
---------
आयुक्तांच्या बजेटचा विकासाला फायदा
आयुक्तांनी मांडलेले अंदाजपत्रक वास्तववादी असून विकासाला चालना देणारे आहे. यामुळे अधिकाधिक निधी उपलब्ध होऊन विकासकामे वेगाने होतील. सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
- सुनीता वाडेकर, गटनेत्या, आरपीआय (आठवले)
--------
महापालिकेचे अंदाजपत्रक वाढता वाढता वाढे असेच आहे. पालिका आयुक्तांनी सादर केलेले ७ हजार ६५० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अवास्तव आहे. अभय योजना आणूनसुध्दा पहिल्या ९ महिन्यांत जेमतेम एक हजार कोटी रुपये मिळकतकराचे आणि दोनशे कोटी रुपयांचे पाणीपट्टीचे उत्पन्न मिळाला आहे. या दोन्हीतून २ हजार ८५० कोटी रुपये उत्पन्न मिळेल हा अतिआत्मविश्वास आहे. बांधकाम परवानगीमधून ९ महिन्यांत जेमतेम २७५ कोटी रुपये मिळाले असून पुढील वर्षी एक हजार कोटी रुपये मिळतील हा आशावाद निराधार आहे. अन्य उत्पन्न कधीही तीनशे कोटींच्यावर मिळाले नसताना ८७६ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज कसा बांधला हे समजत नाही.
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच