शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र सांकला यांच्याकडं मागितली ५० लाखांची खंडणी अन् फ्लॅटही बळकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:42 IST

शिवाजीनगर पोलिसांनी तोतया वकिलासह दोघांवर दाखल केला गुन्हा

ठळक मुद्देफसवणूक करणाऱ्या राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल

पुणे : व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करुन वाट लावून टाकीन अशी प्रसिद्ध उद्योगपतीला धमकी दिली. तसेच जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

याप्रकरणी उद्योगपती रवींद्र नौपतलाल सांकला (वय ५९, रा. आर एन एस बंगलो, अ‍ॅलेक्झांड्रा रोड, कॅन्टोंमेंट) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज (रा. डेक्कन जिमखाना) आणि बापू गोरख शिंदे (रा. मानाजीनगर, नर्‍हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. राजेश बजाज हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतो. 

याबाबत उद्योगपती रवींद्र सांकला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश बजाज याने वकिलीची सनद नसताना बनावट ओळखपत्र तयार करुन सांकला यांचे वकील पत्र पी एम सी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केले. त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये वकिली फी म्हणून घेऊन त्यांचा विश्वासघात केला. तसेच बेकायदेशीरपणे सांकला यांच्या फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेऊन आपले सामान फ्लॅटमध्ये ठेवले.  बापू शिंदे याने ९३ एव्हेन्यू या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा रोख ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली.

खंडणी न दिल्यास वानवडी येथील बांधलेला प्रकल्प बेकायदेशीरपणे बांधलेला आहे. त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करुन तुमची बदनामी करुन वाट लावून टाकीन. तुम्हास कधी संपवून टाकेन अशी धमकी दिली. राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कायद्याखाली कागदपत्रे मागवून त्याद्वारे बदनामी केल्याबद्दल राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. 

बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी फसवणूक केल्याचा दावा करीत राजेश बजाज यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्या फिर्यादीवरुन राजेश बजाज याला गुन्हे शाखेने ऑक्टोंबर २०१७ मध्ये अटक केली होती.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा