शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 01:27 IST

रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे.

Congress Ravindra Dhangekar ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघातानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गंभीर आरोप केले. अपघातावरून सुरू असलेली आरोपांची मालिका सुरू असतानाच धंगेकर यांनी भाजपवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. "एका कंपनीने भाजपला ९९६ कोटी रुपयांचा निवडणूक निधी दिला, त्या बदल्यात आपल्या पुण्याच्या रिंग रोडचे काम त्या कंपनीला दिले. पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैश्यांची दिवसा ढवळ्या लूट केली आहे," असा हल्लाबोल धंगेकर यांनी केला आहे.

भाजपवर आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शहरात सुरू असलेल्या या सर्व गोंधळात तिकडे पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, MSRDC चे अधिकारी व ठेकेदार यांच्या लॉबीने इस्टीमेट रेट पेक्षा तब्बल ४० ते ४५  टक्के जास्त दराने निविदा भरल्याचे निदर्शनास आलं आहे. MSRDC सारख्या महामंडळाने याबाबत व्यवस्थित छाननी करून ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. हेच ठेकेदार NHAI चे काम करत असताना यापेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने काम करतात.यात आणखी एक गंभीर बाब अशी की, यातील मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला यातील ३ टप्प्यांचे काम मिळाले आहे, मेघा इंजिनियर ही भाजपला इलेक्टरोल बाँडच्या माध्यमातून निवडणूक निधी देणारी २ नंबरची कंपनी आहे. या कंपनीने भाजपला तब्बल ९९६ कोटींचा निवडणूक निधी दिलेला आहे. त्यामुळे चंदा दो-धंदा लो असाच काहीसा प्रकार आपल्या रिंग रोडच्या कामात देखील झाला आहे. तसेच रोड वे सोल्युशन या ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या कंपनीला देखील एका वर्षाच्या आत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पवित्र केले व आपल्या रिंग रोडचे काही काम त्यांना देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेचा व पुणे शहरातील नागरिकांचा कररुपी पैसा या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून दिला जातो. कॉन्ट्रॅक्टची रक्कम ४० ते ४५ टक्क्यांनी वाढवली जाते आणि नंतर हेच जास्तीचे पैसे भारतीय जनता पार्टीला निवडणूक निधी म्हणून देण्यात येतात. रिंग रोडच्या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे," अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

दरम्यान, हे सर्व कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, कोणीही चौकशी करू शकता, असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेBJPभाजपा