शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 16:12 IST

श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी हेमंत रासने येणार

पुणे : पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अक्षय गोडसेने स्पष्टीकरण दिले आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत माझा जाहीर पाठिंबा हेमंत रासने यांना असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.   श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे येणार आहेत. तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहेत. अशातच अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरवात झाली. अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उभारणीत गोडसे परिवारच एक मोठं योगदान असून अक्षय यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 

महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं आणि माझ्या परिवाराच गेल्या अनेक वर्षाच नात आहे. माझे आजोबा दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या पासून ते अशोक गोडसे आणि माझ्या पर्यंत त्यांचं अत्यंत स्नेहाच नातं आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसाला धंगेकर हे तब्बल 1 हजार भगवत गिताचे पुस्तके त्यांच्या प्रभागात वाटत होते. गेली अनेक वर्ष त्यांचं आणि आमचं स्नेहाच संबंध आहे. आमच्या परिवाराचं त्यांना पाठबळ असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. 

माझा पाठिंबा हेमंत रासने यानांच 

 मी हेमंत रासने यांना पाठिंबा देणार आहे. रवी भाऊ आमचे व्यक्तिशः चांगले संबंध आहे. पण आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हंटलं नाही. रवींद्र धंगेकर मला सहज भेटायला आले होते. त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता मी हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा असल्याचा व्हिडिओ तयार करणार असल्याचे अक्षय गोडसे याने सांगितले आहे.   

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा