शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या रविंद्र ब-हाटेच्या वकिलालाही ठोकल्या बेड्या; पुण्याजवळच अधिक काळ होता लपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:05 IST

एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहण्यास आश्रय दिल्याप्रकरणी वकिलाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देखंडणी मागितल्याप्रकरणी रविंद्र ब-हाटे याच्यासह १३ जणांवर करण्यात आला होता गुन्हा दाखल

पुणे : मोक्यासारख्या गंभीर गुन्हयात फरारी असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र ब-हाटे याला आश्रय देणा-या वकिलाला पोलिसांनीअटक केली. याच वकिलाच्या घरातून पोलिसांना आव्हान देणारे व्हिडिओ ब-हाटे याने सोशल मीडियावरून व्हायरल केले होते. मात्र शोध घेऊनही ब-हाटे पोलिसांना सापडत नव्हता. राज्यभर पोलीस शोध घेत असताना पुण्याजवळच तो अधिक काळ लपून बसला होता, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

सागर संजय म्हस्के ( वय ३२ रा.म्हस्के वस्ती, कळस आळंदी रस्ता) असे अ़टक केलेल्या वकिलाचे नाव आहे. एक डझनहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या रविंद्र ब-हाटेला फरार मुदतीत रूमवर राहण्यास आश्रय दिल्याप्रकरणी मस्के याला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा १ चे सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.  फिर्यादीचे रो हाऊस जबरदस्तीने हडपण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत बनावट दस्तबनवण्याबरोबरच खंडणी मागितल्याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रविंद्र ब-हाटे याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यात ब-हाटेवरमोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ब-हाटे हा दीड वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता. तो आळंदी रस्त्यावरील म्हस्के वस्ती येथे सागर म्हस्के याच्या घरात राहात असल्याचे निष्पन्न झाले आहे. ब-हाटे याला फरार राहाण्यास आणि त्याचे अस्तित्व लपविण्यास मदत केल्याप्रकरणी सागर म्हस्के याला गुरूवारी (दि.२६) पावणे सात वाजता अटक करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय