शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर बलात्कार करणाऱ्या स्कूल बस चालकाला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:26 IST

अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते.

ठळक मुद्देबसमध्येच करत होता कुकर्म : पहिलीतील मुलगी, शहरात व्यक्त झाला होता संतापपीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची

पुणे : वारजे येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये शिकणा-या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणा-या स्कूल बसच्या चालकाला दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा निकाल दिला.या घटनेची माहिती समजता पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केले होते. तसेच स्कूलबसने प्रवास करणा-या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. संदिप शिवाजी कुंभार (वय ३०, रा. कामठे वस्ती, शिवणे) असे शिक्षा झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे. याबाबत सहा वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. १० ते १३ नोव्हेंबर २०१४ दरम्यान पीडित मुलगी जात असलेल्या शाळेच्या परीसरात आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. अ‍ॅड. मोरे यांनी याप्रकरणी एकूण ८ साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी पीडित मुलगी आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. अ‍ॅड. स्मिता देशमुख यांनी खटल्यात सहकार्य केले. फिर्यादी यांना दोन मुली आहेत. त्यांची सहा वर्षांची मोठी मुलगी वारजे येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. कुंभार चालक असलेल्या स्कूलबसमधून ती शाळेत जात. कुंभार इतर मुलांना- मुलींना बसमधून उतरविल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीला त्रास होत होता. त्याबाबत तिच्या आईने तिला विचारल्यानंतर मुलीने आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल सांगितले. त्यानुसार कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची मानताना दहा वर्ष सक्तमजुरी सुनावली. गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल नाईक यांनी केला. शहरात खळबळ माजविणारी घटना अत्याचाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. स्कूलबसमधून शाळेत जाणा-या मुला-मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला होता. अशा तसेच याप्रकरणी शाळेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून याबाबत कडक नियमावली घालून देण्यात आली होती.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसCrimeगुन्हा