शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईच्या प्रियकराकडून तरुणीवर बलात्कार; वयाच्या चौदाव्या वर्षापासून लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 11:59 IST

आई व बहिणीला मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्ती...

पिंपरी : आईच्या प्रियकराने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तिच्या आई व बहिणीला मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी जबरदस्ती केली. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी 'त्या' प्रियकराला अटक केली. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे, इंदोरी तसेच भंडारा डोंगराच्या जंगलात २०१४ पासून ते ११ एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. 

जनार्दन सोमाजी शितोळे (वय ४०, रा. बहुळ, ता. मावळ), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. ११) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शितोळे हा फिर्यादी तरुणीच्या आईचा प्रियकर आहे. त्याचे फिर्यादीच्या घरी येणे-जाणे असते. फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी तरूणीच्या आई व बहीण यांना मारून टाकण्याची धमकी देऊन वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. 

आरोपीने सोमवारी (दि. ११) रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी तरुणीवर जबरदस्ती केली. या अत्याचाराबाबत तरुणीने आईला सांगितले. त्यामुळे आरोपीने शिवीगाळ करून तरुणीला हाताने मारहाण केली. 

'ती' बोलती झाली म्हणून...

फिर्यादी तरुणी अल्पवयीन असल्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तिला धमकी दिल्यामुळे ती अत्याचार सहन करीत होती. तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. मात्र ते असह्य झाल्यानंतर तिने आईला सांगितले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आईसोबत पोलीस ठाण्यात येऊन पीडित तरुणीने तक्रार केली. बलात्कार प्रकरणी तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करण्याच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीmavalमावळTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड