शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये तरुणीवर बलात्कार; मित्रांची व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 11:40 IST

तरुणीचा मित्र त्याची आई-बहीणसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : तरुणाने मैत्रिणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने आश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसऱ्या मित्राच्या मार्फत चित्रीकरण केले. काही दिवसांनंतर ते चित्रीकरण इतर दोन मित्रांना पाठवले. त्या मित्रांनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित तरुणी तिच्या मित्राच्या आईला सांगण्यासाठी घरी गेली. मात्र, तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ही धक्कादायक घटना कोंढव्यातील आश्रफनगर परिसरात घडली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणीचा मित्र त्याची आई-बहीण व मित्राचे इतर दोन मित्र अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २० वर्षांच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना ऑगस्ट २०२१ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी व आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने आश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसऱ्या मित्राच्या मार्फत चित्रीकरण केले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग