खराबवाडीत दिराचा नवविवाहितेवर बलात्कार; चाकण पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:43 IST2017-12-11T16:37:32+5:302017-12-11T16:43:07+5:30

खराबवाडी (ता. खेड) येथे राहावयास असलेल्या मूळच्या बेळगाव (कर्नाटक) येथील एकोणीस वर्षाच्या नवविवाहितेवर सख्ख्या दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Rape of newlyweds women; Chakan police in pune filed the crime | खराबवाडीत दिराचा नवविवाहितेवर बलात्कार; चाकण पोलिसांनी दाखल केला गुन्हा

खराबवाडीत दिराचा नवविवाहितेवर बलात्कार; चाकण पोलिसांनी दाखल केला गुन्हा

ठळक मुद्देदिराच्या आक्षेपार्ह वागणुकीबाबत पतीला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने घडला प्रकारनवविवाहितेच्या तक्रारीनंतर नराधम दिरावर चाकण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल

चाकण : येथील खराबवाडी (ता. खेड) येथे भाड्याच्या खोलीत राहावयास असलेल्या मूळच्या बेळगाव (कर्नाटक) येथील एकोणीस वर्षाच्या नवविवाहितेवर सख्ख्या दिराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवविवाहितेने दिराच्या आक्षेपार्ह वागणुकीबाबत पतीला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे समजत आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी नराधम दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 
संबंधित नवविवाहितेचे लग्न २१ एप्रिल २०१७ मध्ये बेळगाव (कर्नाटक) येथे धार्मिक रितीरिवाजानुसार झाले. त्यानंतर संबंधित विवाहिता पती व दिराच्या सोबत चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत नोकरीच्या निमित्ताने आले होते. पती कामावर गेल्यानंतर घरी असलेल्या धाकट्या दिराने अनेकदा संबंधित भावजयीशी अत्यंत आक्षेपार्ह वर्तन केले होते. त्यानंतर दिराच्या या वाढलेल्या त्रासाबाबत विवाहितेने पतीला सांगितले. मात्र पतीने त्यास समजावून सांगतो, असे सांगून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्याचाच फायदा घेत अखेरीस ३० नोव्हेंबर २०१७ रोजी घरात एकट्या असलेल्या भावजयीवर नराधम दिराने अतिप्रसंग केला. या बाबत संबंधित विवाहितेने रविवारी चाकण पोलिसांत येऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी नराधम दिरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: Rape of newlyweds women; Chakan police in pune filed the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.