वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:18 IST2018-04-11T15:18:02+5:302018-04-11T15:18:02+5:30
वाकडमध्ये राहणारा सूरज आणि पीडित मुलगी २०१४ पासून चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार
पिंपरी : वाकडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. सूरज नढे (वय २५, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीने या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारा सूरज आणि पीडित मुलगी २०१४ पासून चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सूरजने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून घरात, हॉटेलमध्ये नेत तिच्याशी शरीरसंबंधही ठेवले. मार्च २०१८ मध्ये पीडित तरुणी गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तरुणीने सूरजचे घर गाठले. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनीही स्वीकारण्यास नकार देत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. अखेर या पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार केली. सूरज विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.