शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीच्या पतीनेच केला बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीच्या मित्रानेही केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 18:27 IST

तरुणीची मैत्रिणीच्या पतीशी इंस्टग्रामवर ओळख झाली होती

पुणे : मैत्रिणीचा पती म्हणून तिचा त्याच्याशी संपर्क होता. इन्स्टाग्रामवरून त्याने तू खूप आवडतेस, असे म्हणून तिला फिरायला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, तसेच तिच्याकडून पैसे घेतले. त्याच्या मित्रानेही तिला धमकावून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करून, तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी खराडी येथील एका २३ वर्षांच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय २२) आणि आशिष विजय कांबळे (वय २३, दोघे रा.थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. हा प्रकार खराडीतील डब्ल्यूटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवेनगरमधील कृष्णा लॉज येथे जून, २०२१ ते २० मे, २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हा फिर्यादीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने फिर्यादीचे इन्स्टाग्राम अकाउंटवरून फिर्यादी यांना मेसेज करून फिर्यादी यांना मोबाइलवर फोन करून, तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादीचे नग्न फोटो व व्हिडीओ काढले. ते फोटो, व्हिडीओ व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना दाखवितो, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी १७ हजार रुपये घेतले, तसेच त्याचा मित्र आशिष कांबळे याने फिर्यादी यांना धमकी देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. तिला हाताने मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यामुळे सतत होणारा अत्याचार आणि पैशांची मागणी याला कंटाळून शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला