मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:09 IST2018-09-12T01:08:55+5:302018-09-12T01:09:16+5:30

रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा मोका साधून व चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली

Rape accused from brother | मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक

मानलेल्या भावाकडून बलात्कार, आरोपीला अटक

लोणी काळभोर : रात्रीच्या वेळी घरात कुणी नसल्याचा मोका साधून व चाकूने भोसकून जिवे मारण्याची धमकी देत मानलेल्या भावानेच एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : याप्रकरणी दादा भीमा केसकर (वय २४, रा. कासुर्डी, ता. दौंड) याला अटक केली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता फिर्यादी महिलेच्या घरात घडली. सदर महिला आपला पती व दीड वर्षाच्या मुलासह येथे राहत आहे. या महिलेचे नातेवाईक दौंड तालुक्यातील कासुर्डी येथे आहेत. त्यांना भेटण्यासाठी महिला कासुर्डी येथे अधूनमधून जात होती. त्यामुळे तेथील केसकर याच्याशी तिची ओळख झाली होती. तिने त्याला भाऊ मानले होते. त्यामुळे तो अधूनमधून फिर्यादीच्या घरी येत होता.
८ सप्टेंबर रोजी तिचे पती देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे सदर महिला व तिचा दीड वर्षाचा मुलगा असे दोघेच घरी होते. रात्री जेवण करून सदर महिला झोपली होती. रात्री ११ वाजता दादा केसकर तिच्या घरी गेला. तू मला खूप आवडते असे तिला म्हणाला. आपण बहीण-भाऊ आहोत असे महिला त्याला म्हणाली. परंतु, आरोपीने तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून व ओरडली तर चाकूने भोसकून ठार मारण्याची धमकी देत बलात्कार केला.
>पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे. त्याच्या कृत्यामुळे महिला घाबरलेली आहे. न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करीत आहेत.

Web Title: Rape accused from brother