शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन मागितली २ लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 13:14 IST

या तिघा अपहरण करणार्‍यांनी ऑफिस बॉयला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध केला गुन्हा दाखल

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणार्‍या ऑफिस बॉयचे तिघांनी जबरदस्तीने अपहरण करुन त्याला सोडून देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार गण्या व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या ऑफिस बॉय म्हणून काम करणार्‍या मुलाने गुन्हेगारांचे भांडण सुरु असताना रात्री स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. त्याला येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते. 

याप्रकरणी साईकमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे वारजे येथील कार्यालय आहे. १८ वर्षाचा धिरज ऑफिस बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी तो शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथे आला असताना गण्या व त्याच्या दोन साथीदाराने धिरज याला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसविले व येरवडा येथे जायचे असल्याचे सांगून त्याला घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी जावळकोटी यांना वेगवेगळ्या चार मोबाईलवरुन फोन करुन धिरजला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. जावळकोटी यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. पोलिसांनी धिरज याचा शोध सुरु केला. तेव्हा त्याला रिक्षातून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. धिरज याचा शोध सुरु असतानाच त्याने स्वत: या मुलांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. 

या तिघा अपहरण करणार्‍यांनी ऑफिस बॉयला येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात एका खोलीत कोंडून ठेवले होते. तेथूनच त्यांनी जावळकोटी यांना फोन करुन खंडणी मागितली होती. त्यानंतर त्यांच्यात बोलाचाली सुरु असताना अचानक तिघे भांडू लागले. ही संधी साधून धिरज याने त्यांना धक्का देऊन त्यांना काही समजायच्या आत तेथून पळून आला. वारजे पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस