Ramdas Athawale: 'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:49 IST2022-01-01T16:48:31+5:302022-01-01T16:49:05+5:30
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नव्या वर्षांचा संकल्प असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Ramdas Athawale: 'आज मला झाला हर्ष...', नववर्षाच्या स्वागतावर रामदास आठवलेंची खास कविता, केला अनोखा संकल्प
पुणे-
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नव्या वर्षांचा संकल्प असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसंच येत्या वर्षात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवायची आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
आपल्या हटके कवितांसाठी ओळखले जाणारे रामदास आठवले यांनी नववर्षाचं स्वागत करतानाही आपल्या खास अंदाजात कविता सादर केली. "आज मला झाला हर्ष...कारण आज आमच्या समोर उभं आहे २०२२ चं वर्ष", असं म्हणत रामदास आठवले यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते आज कोरेभाव भीमा येथे आले होते.
रामदास आठवले यांनी २०२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील संकल्प असल्याचं यावेळी सांगितलं. "कोरेगाव भीमला मी भेट दिली आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. शौर्यदिन आहे. नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवणं हाच आहे. तसंच रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं आणि आमचं संघटन वाढवणं हा देखील संकल्प आहे", असं रामदास आठवले म्हणाले.