पुण्यात रामदास आठवलेंची जीभ घसरली, अजित पवारांबाबत केले वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 19:38 IST2018-05-26T19:38:03+5:302018-05-26T19:38:03+5:30
आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले.

पुण्यात रामदास आठवलेंची जीभ घसरली, अजित पवारांबाबत केले वक्तव्य
पुणे : आरपीआयच्या आठवले गटाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ घसरल्याचे उदाहरण शनिवारी पुण्यात बघायला मिळाले. रविवारी आरपीआयच्या राष्ट्रीय अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावल्यास त्यांना जलसंधारण शिकावं लागेल अशी खोचक प्रतिक्रिया आठवले यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी असे ट्विट केले होते. त्यावर पवार यांनीही विनामूल्य शिकवणी घेण्यास तयार असल्याचे उत्तर दिले होते. याबाबत आठवले यांना विचारले असता त्यांनी पवार यांच्याकडून जलसंधारण शिकावं लागेल असे वक्तव्य केले. पवार यांनी धरणांबाबत काही वर्षांपूर्वी आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते त्याबाबत पवार यांनी आत्मक्लेश केला होता. अर्थात आठवले यांनी आपल्या बोलण्यावर सारवासारव करताना मुख्यमंत्री पवार यांची चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतील असेही म्हटले. आठवले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देईल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.