महिनाभरातच राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 17:11 IST2019-09-08T17:09:15+5:302019-09-08T17:11:15+5:30

महिन्याभरात राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

ram janmabhumi issue will resolve within month says chandrakant patil | महिनाभरातच राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : चंद्रकांत पाटील

महिनाभरातच राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : चंद्रकांत पाटील

बारामती : केंद्रामध्ये मजबूत सराकार आल्यामुळे भाजपच्या बौद्धीक अजेंड्यावरील एकापाठोपाठ एक विषय मागी लावले जात आहेत. महिनाभरात राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष व महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

बारामती येथे भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, केंद्रात मजबूत सरकार आल्यामुळे भाजपने आपल्या अजेंड्यावरील अनेक विषय मार्गी लावले आहेत. ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काश्मिर प्रश्नाबाबत पंतप्रधान मोदींनी धडाडीने निर्णय घेतले. काश्मिरमधील कलम ३७० व ३५ ए रद्द करून दाखवले. तसेच तीन तलाक कायदा करून मुस्लिम महिलांच्या पायातील बेडी सोडविली. राज्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत. त्यामुळे पुन्हा राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. हे पवारांना देखील सांगा. त्यांना अजुनही वाटत आहे राज्यात त्यांचे सरकार येईल, असा टोला पाटील यांनी लगवला.

यावेळी जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग लोकांच्या अडअडचणी सोडवण्यासाठी करा. कोणत्याही कामासाठी एक रूपयाही घेऊ नका, असा सल्लाही भाजप कार्यकर्त्यांना पाटील यांनी दिली.

 

Web Title: ram janmabhumi issue will resolve within month says chandrakant patil