शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

पुण्यातील राम बांगड यांचे १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेटलेट्स दान! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 10:48 IST

राम बांगड हे ‘रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांना सामाजिक सेवेची आवड

ठळक मुद्देकोरोनाकाळात देशभरात ९०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न

धनकवडी: सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वयाच्या ६४ व्या वर्षापर्यंत तब्बल १३४ वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेट लेट्स दान केलेले असामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या राम बांगड यांच्या कार्याची दखल एक विक्रम म्हणून घेतली गेली  आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नुकतीच त्यांनी आजवर केलेले प्लाझ्मा दानाचे काम विक्रम म्हणून नोंदवले गेले आहे.  

राम बांगड हे ‘रक्ताचे नाते चॅरीटेबल ट्रस्ट’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक सेवेची आवड होती. १९७६ साली एका दुर्घटनेमध्ये एका मुलीला रुग्णालयात रक्ताची गरज असल्याने त्यांनी मदत केली आणि तो क्षणच आयुष्यात प्रेरणा देणारा ठरला. तेव्हापासून त्यांनी स्वत: रक्तदान करण्यास सुरुवात केली. आजवर १३४ वेळा त्यांनी स्वतः रक्तदान केलेले आहे. हा परीघ विस्तारावा म्हणून २००१ साली त्यांनी ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली. त्या माध्यमातून रक्तदान शिबीरे आयोजित करून आजवर हजारो बाटल्या रक्त संकलित केले आणि शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. आजवर १५ राज्ये आणि २२ जिल्ह्यांत त्यांनी ५० हजार रक्तदाते उभे केले आहेत. तर ट्रस्टच्या माध्यमातून एक हजाराहून अधिक शिबीरे आयोजित केलेली आहेत. 

कोरोनाकाळात ९०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी प्रयत्न

कोरोनाकाळात देशभरात ९०० हून अधिक लोकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या या विधायक सामाजिक कामासाठी त्यांना दोनशे हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. 

आपल्या कार्याची विक्रमी नोंद झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राम बांगड म्हणाले, ‘‘रक्तदानासारखं कोणतंही सर्वश्रेष्ठ दान नाही. त्याचा आनंद प्रत्येकाने घ्यायला हवा. सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून रक्तदान करायला हवे. आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने माझ्या कामाची दखल घेतली याचा निश्चितच आनंद आहे. 

टॅग्स :PuneपुणेBlood Bankरक्तपेढीSocialसामाजिकdocterडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत