जेजुरीत रस्ता सुरक्षासाठी रॅली

By Admin | Updated: January 23, 2017 02:26 IST2017-01-23T02:26:35+5:302017-01-23T02:26:35+5:30

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जेजुरी येथे दि. १७ रोजी

Rally for road safety in Jezuri | जेजुरीत रस्ता सुरक्षासाठी रॅली

जेजुरीत रस्ता सुरक्षासाठी रॅली

जेजुरी : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जेजुरी पोलीस स्टेशन व जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने जेजुरी येथे दि. १७ रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली.
जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, पर्यवेक्षक पांडुरंग पाटील, कैलास शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली. या वेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास आपल्याबरोबर इतरांचेही प्राण वाचविता येतील. वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जड मालाची ने-आण करू नये. वाहन चालवताना चिन्हांचे व सिग्नलच्या नियमांचे पालन करावे, त्यांचे उल्लंघन करू नये, वाहन चालवताना वाहनचालकाने योग्य त्या इशाऱ्याचा उपयोग करावा, वाहनचालकाने आपले वाहन सार्वजनिक ठिकाणी इतर वाहनांना अडथळा होईल असे उभे करू नये, वाहनचालकाला आपले वाहन सार्वजनिक ठिकाणी थांबवायचे म्हणजे पार्किंग करावयाचे असल्यास गाडीचे इंजिन बंद करून, हँडब्रेक वर करून दरवाजे सर्व व्यवस्थित लॉक करून टायरला दगड किंवा उटी लावून घ्यावी. या वेळी जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच गाडी चालवू, अशी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भीमराव पानसरे, संजय फरांदे, पोलीस नाईक संदीप कारंडे, कुलदीप फलफले, दीपक आवळे, सागर शिंगाडे, पोलीसमित्र भूषण कदम, जिजामाता विद्यालयाचे शिक्षक सोमनाथ उबाळे, प्रल्हाद गिरमे, सागर चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Rally for road safety in Jezuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.