शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

पुरंदरमधील राख गाव ठरणार पथदिव्यांसाठी सौरऊर्जा वापरणारे राज्यातील पहिले गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 10:40 IST

नीरा : राज्य सरकारने ग्रामीण भागातील पथदिवे सोलर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी ...

नीरा : राज्य सरकारने ग्रामीण भागातील पथदिवे सोलर ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी तशी घोषणाही केली आहे. आता अनेक गावे सौरऊर्जा वापरतील. यामध्ये पुरंदर तालुक्यातील राख गावाने आघाडी घेतली आहे. पथदिव्यांसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील दुसरे आणि राज्यातील पहिले गाव हे पुरंदर तालुक्यातील राख असणार आहे.

याबाबतची माहिती राख येथील महेंद्र माने यांनी दिली. नेट मेटरींगच्या माध्यमातून दिवसभरात तयार झालेली वीज दिवसा महावितरणला दिली जाणार आहे, तर रात्री पथदिव्यांसाठी पुन्हा महावितरणाकडून वीज घेतली जाणार आहे. दररोज १,५०० युनिट वीज यातून निर्माण होणार असून, रोज तेवढीच वीज महावितरणकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला शून्य बिल येणार आहे.

१२० खांबांद्वारे गाव उजाळणार आहे. ५२ लाख ५० हजार रुपयांचे हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे व पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या फंडातून हा राज्यातील पहिला प्रकल्प असून, जानेवारी महिन्यात याचे उद्घाटन होणार आहे. सध्या राखमलस्वामी मंदिर, आरोग्य उपकेंद्र, महादेव मंदिर, स्मशानभूमी, माने वस्ती असे २.५ किलोमीटर रस्त्याच्या शेजारी खांब उभे करण्याचे काम सुरू आहे.

‘थकित वीजबिलांमुळे ग्रामपंचायती मेटाकुटीला आल्या आहेत. कमी लोकसंख्येच्या व भौगोलिक परिसर मोठा असलेल्या गावांना कर कमी येत असतो. वीज देयके अधिक थकल्याने थकबाकीचा फुगवटा वाढत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे सोलर प्रकल्प आहे. शासनाने असे प्रकल्प गावोगावी राबवावेत.’

- महेंद्र माने, चेअरमन, राख विकास सोसायटी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPurandarपुरंदर