लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : किल्ले राजगडावर राजमाता जिजाऊंचा जयंती महत्सोव मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी
राजमाता जिजाऊंच्या जयघोषांने संपुर्ण राजगड परिसर दुमदुमला होता.
गडाच्या पायथ्याशी
असलेल्या राजमाता जिजाऊच्या मावळा तिर्थावर शिवप्रेमीच्या उपस्थित जिजाऊ माता जयंती साजरी
करण्यात आली. राजमाता जिजाऊची जयंती निमित्त पाल बुद्रुक येथील जिजाऊंच्या मावळा तिर्थावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मावळा जवान संघटनेकडुन या ठिकाणी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेची पालखी काढण्यात आली होती. कोल्हापुर येथील हातकंगले मधुन ५० शिवकन्या या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आल्या होत्या. राजमाता जिजाऊंच्या जीवनावर येथील राजकन्यांनी जिजाऊंच्या गुणांचे विविध पैलु यावेळी सांगितले. तसेच
राजमाता जिजाऊंच्या नावाने यावेळी पुरस्कार देण्यात आले. वेल्हे तालुक्यात कोरोनाच्या कालावधीतमध्ये वेल्हेतील डॅाक्टर दापंत्यांनी चांगले काम केले. या साठी डॅा.दिप्ती शैलेश सुर्यवंशी यांना यावेळी मावळा जवान संघटनेकडुन राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सारिका इंगळे, जिल्हा
परिषद सदस्य दिनकर धरपाळे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी
विशाल शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नितिन ढुके, इतिहास संशोधक दत्ता नलावडे, शिवशंभु प्रतिष्ठान कात्रजचे अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रसेवा समुह धायरी अध्यक्ष राहुल पोकळे, शिल्पकार महेंद्र थोपटे, सुधाकर रणखांबे, आदीसह शिवप्रेमी उपस्थित होते.
चौकट
वेल्हे येथिल शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने देखील मेंगाई मंदीर परिसरात राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. जिजाऊंच्या प्रतिमेची यावेळी समितीच्या वतीने पुजन करण्यात आले यावेळी कैलास बोराणे, सुनिल वेगरे, रविराज गायकवाड, सुनिल साबळे, संतोष बोराणे, सुधीर जायभाय उपस्थित होते.
फोटोसाठी ओळ राजमाता जिजाऊ स्मृती स्थळ पाल बु (ता.वेल्हे) राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेची पालखी शिवकन्या व मावळा जवान कडुन काढण्यात आली.