राजमाता जिजाऊंनी कणखर शिवबा घडवले : वाळुंजकर
By Admin | Updated: January 14, 2017 03:09 IST2017-01-14T03:09:29+5:302017-01-14T03:09:29+5:30
राजमाता जिजाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाने, मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजे घडले. एक आदर्श राजा कसा असावा, हे शिवाजी

राजमाता जिजाऊंनी कणखर शिवबा घडवले : वाळुंजकर
वाडा : राजमाता जिजाऊ यांच्या खंबीर नेतृत्वाने, मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी राजे घडले. एक आदर्श राजा कसा असावा, हे शिवाजी राजांच्या कार्यातून त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यातून शिकता येईल. राजमाता जिजाऊ यांनी बालपणापासूनच शिवरायांना सुस्ंकार, चांगल्या राज्यकारभाराचे धडे दिले. म्हणूनच एक आदर्श राजे घडले हे जिजाऊ यांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत व तरुणांसाठी आदर्श असलेले स्वामी विवेकानंद यांचे विचार, कार्य, सुसंस्कार देखील आजच्या तरुण पिढीने घेणे गरजेचे आहे, असे मत दावडी विद्यालायाचे मुख्याध्यापक के. एम. वाळुंजकर यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचे जवाहर विद्यालय, चासकमान येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलराव मुळुक, व्ही. वाय. वाघमारे, ए. डी. अभंग, एस. एम. गायकवाड, वाय. बी. बनसोडे उपस्थित होते.