शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राजगड ते तोरणा' रोप वे ’ चा विशेष मार्ग सुरु करावा : मनविसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 20:38 IST

गडावरील सोयी सुविधांबाबत शासन गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही...

ठळक मुद्देराजगड किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमी तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय

चंदननगर:  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही होती. राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. राजगड किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींची तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, शासनाकडून शिवप्रेमींसाठी गडावर कोणतीही व्यवस्था होताना दिसत नाही. या राजगडावर अल्पोपहार (झुणका भाकर) तसेच प्राथमिक उपचारासाठी आरोग्य केंद्राची सोयसुध्दा नाही. गडावरील सोय-सुविधाबाबत शासन मात्र म्हणावे एवढे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.  राजगड ते तोरणा किल्लाचे अंतर पाहता शासनाने निधी उपलब्ध करत रोप वे मार्गाची विशेष व्यवस्था केली तर गड -किल्ले अभ्यासक विद्यार्थी ,शिवप्रेमींची तसेच पर्यटकांची विशेष व्यवस्था होऊ शकेल.    शासनाने त्वरित 'राजगड' किल्ल्यावर गड चढणारे विद्यार्थी ,शिवप्रेमी,पर्यटकांसाठी गडावर विशेष व्यवस्था करत प्राथमिक उपचारसाठी आरोग्यकेंद्र तसेच अल्पोपहार केंद्राची व्यवस्था करावी. तसेच राजगड ते तोरणा रोप वे मार्गासाठी निधी उभारत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत शासनाने रोप वे मार्गाची विशेष व्यवस्था करावी, अशा मागणीचे लेखी निवेदन येरवडा येथील पुरातत्व विभागाच्या कार्यालयात सहाय्यक संचालक यांच्याकडे केली.यावेळी कल्पेश यादव,  विक्रांत अमराळे अमोल शिंदे,कुलदिप घोडके,राहुल प्रताप,सोहित बनकर ,महेश राजगुरु,सागर खांदवे,निखील निंबाळकर ,आशिष म्हसाडे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदवी स्वराजाची ग्वाही देणारा 'राजगडावर' शिवप्रेमीसाठी आरोग्य केंद्र व अल्पोपहार केंद तसेच 'राजगड ते तोरणा' रोप वे चा विशेष मार्ग करण्यासाठी विशेष आराखडा तयार करा- कल्पेश यादव , पुणे शहर अध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरFortगडState Governmentराज्य सरकारMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे