शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उद्योगपती रवींद्र सांकला यांना ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या राजेश बजाज, बापू शिंदेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:36 IST

खंडणी मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला होता

ठळक मुद्देदोघांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली

पुणे: व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा ५० लाख रुपये खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करुन वाट लावून टाकीन अशी प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र सांकला धमकी देणाऱ्या राजेश बजाज, बापू शिंदेला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  याप्रकरणी उद्योगपती रवींद्र नौपतलाल सांकला (वय ५९, रा. आर एन एस बंगलो, अ‍ॅलेक्झांड्रा रोड, कॅन्टोंमेंट) यांनी फिर्याद दिली होती. त्यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल बजाज (रा. डेक्कन जिमखाना) आणि बापू गोरख शिंदे (रा. मानाजीनगर, नर्‍हे रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला करण्यात आला होता. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते १६ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. 

राजेश बजाज हा स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेतो. याबाबत उद्योगपती रवींद्र सांकला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेश बजाज याने वकिलीची सनद नसताना बनावट ओळखपत्र तयार करुन सांकला यांचे वकील पत्र पी एम सी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केले होते. त्यांच्याकडून ९ लाख ९० हजार रुपये वकिली फी म्हणून घेऊन त्यांचा विश्वासघात केला होता. तसेच बेकायदेशीरपणे सांकला यांच्या फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेऊन आपले सामान फ्लॅटमध्ये ठेवले. बापू शिंदे याने ९३ एव्हेन्यू या व्यावसायिक प्रकल्पातील एक ऑफीस मोफत द्या किंवा रोख ५० लाख रुपये द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास वानवडी येथील बांधलेला प्रकल्प बेकायदेशीरपणे बांधलेला आहे. त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करुन तुमची बदनामी करुन वाट लावून टाकीन. तुम्हास कधी संपवून टाकेन अशी धमकी दिली होती. 

राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्याविरुद्ध माहिती अधिकार कायद्याखाली कागदपत्रे मागवून त्याद्वारे बदनामी केल्याबद्दल राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला होता. बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांनी फसवणूक केल्याचा दावा करीत राजेश बजाज यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानंतर बांधकाम व्यावसायिक आदित्य दाढे यांच्या फिर्यादीवरुन राजेश बजाज याला गुन्हे शाखेने ऑक्टोंबर २०१७ मध्ये अटक केली होती.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी