शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

अखेर प्रतीक्षा संपली ! 'पीएमपी' ला मिळाला पूर्णवेळ अध्यक्ष, राजेंद्र जगताप यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 2:46 PM

पीएमपी ला पूर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार, याची प्रतिक्षा होती. अखेर ती शुक्रवारी पूर्ण केली.

पुणे : मागील काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले स्मार्ट सिटीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्याकडे अखेर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यशदाच्या उपमहासंचालक नयना गुंडे यांच्याकडे मागील चार महिन्यांपासून पीएमपीचा अतिरिक्त पदभार होता. नयना गुंडे या पीएमपीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या. आर. एन. जोशी यांच्यानंतर त्यांच सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिल्या आहेत. जानेवारी महिन्यात त्यांची आदिवासी कल्याण विभाग बदली करण्यात आली. परंतु डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पीएमपीचा पदभार न स्वीकारल्याने गुंडे यांनी पीएमपीतच थांबावे लागले. त्यानंतर पुन्हा १२ मार्च रोजी त्यांची यशदामध्ये उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यावेळी पीएमपीचा भार कोणावरही सोपविण्यात आला नाही. त्यावेळीही गुंडे यांच्याकडेच पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे पीएमपीला पुर्णवेळ अध्यक्ष कधी मिळणार, याची प्रतिक्षा होती. अखेर राज्य शासनाने जगताप यांची नियुक्ती केली.जगताप हे २०१२ पासून राज्य शासन सेवेत प्रतिनियुक्तीवर आले आहेत. ते भारतीय संरक्षण संपदा सेवा विभागातील अधिकारी आहेत. त्यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. स्मार्ट सिटीतून त्यांची बदली झाल्यानंतर ते सुमारे आठ महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. स्मार्ट सिटीमध्ये असताना पीएमपीच्या काही योजनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना पीएमपीच्या कामकाजाची माहिती आहे.  

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेState Governmentराज्य सरकार