पुणे :महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा दि. 11 व 12 जानेवारी तर महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा दि. 15 ते 21 जानेवारी या कालावधीत होत आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होणार आहे.
5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा तर पाचवी ते दहावी या इयत्तेतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे यंदाचे 32वे तर राजा नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धेत 20 शाळांनी सहभाग घेतला असून राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेत 20 शाळांचा सहभाग आहे. भालबा केळकर नाटिका स्पर्धेचे वेळापत्रक:दि. 11 : दुपारी 1 ते 4भारतीय विद्या भवन संस्थेचे परांजपे विद्या मंदिर (चि. का. गो.), डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा (जीवन त्यांना कळले हो), संक्रमण, पुणे (दिवाळीचं गिफ्ट), सायंकाळी 5 ते 8माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (कथा आमच्या शिक्षणाची), ॲपॉस्ट्रॉफी नेक्स्ट (खट्याळ उंदिर), महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल (हास्यमंत्र), टँगी ट्विस्टर बॉक्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस् (संप), सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (मुकुटाचा मान कोणाला?). दि. 12 : दुपारी 1 ते 4महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे आरुणी विद्या मंदिर (विकल्प बन), रॅडक्लिफ स्कूल (जादूगार), मानव्य (वाढदिवस), आर्यन्स वर्ल्ड स्कूल वारजे (व्हाईट वॉश), आकांक्षा बालरंगभूमी (रंगीत गोष्ट). सायंकाळी 5 ते 8श्रीनिवास सिरिन काऊंटी एबीसी को.ऑप. सोसायटी (पणजीची गोष्ट), शिशु विहार प्राथमिक शाळा (शेवटचा गणपती), स्वर-साधना (मॉनिटर), कला केंद्र (माझा बाप्पा), नाटकाची शाळा (मिशन गणपती).
राज नातू करंडक एकांकिका स्पर्धेचे वेळा पत्रक :
दि. 15 : सायंकाळी 5 ते 7एस. पी. एम. इंग्लिश स्कूल (झिलमिल), परांजपे विद्या मंदिर (माकी मिका 2). दि. 17 : सायंकाळी 5 ते 8नू. म. वि. मुलींची शाळा (बिहाईंड द ट्रूथ), ज्ञान प्रबोधिनी, पुणे (सुनिओ), व्हिजन इंग्लिश मिडियम स्कूल (केस स्टडी). दि. 18 : सायंकाळी 5 ते 8रामचंद्र राठी मराठी माध्यमिक विद्यालय (इको फ्रेन्डली), रॅडक्लिफ स्कूल (जंबा बुंबा बो), सेवासदन इंग्लिश मिडियम स्कूल (प्लॅन चीट), दि. 19 : दुपारी 1 ते 4न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग (माय सुपर हिरो), आर्यन्स स्कूल, भिलारेवाडी (गोष्टींची गोष्ट), आर्यन्स वर्ल्ड स्कूल, वारजे (आदिम). सायंकाळी 5 ते 8मॉडर्न हायस्कूल (मायबोलीत रंग), श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय (नकुशा), जी. के. गुरुकुल (द लेसन). दि. 20 : सायंकाळी 5 ते 8शिवाजी मराठा विद्यालय (आखिर अभिमन्यूने चक्रव्यूह तोडलेच), मानव्य (देवाला प त्र), बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल (स्वयंपूर्ण). दि. 21 : सायंकाळी 5 ते 8डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, गणेशनगर (गेम ओव्हर), भारतीय विद्या भवन, सुलोचना नातू विद्या मंदिर (ए फॉर), सिल्व्हर क्रेस्ट स्कूल (अटक मटक वेगळीच चटक).